तालुका प्रतिनिधी-सलीम शेख नागभीड
नागभीड :- आज दिनांक- 03/07/2024 रोज बुधवार ला *मा वृषभ भाऊ खापर्डे तालुका अध्यक्ष तसेच नानक नाकाडे शहर अध्यक्ष यांच्या उपस्थिती* *दुपारी 2.00* वाजता जनसंपर्क कार्यालय नागभीड येथे मीटिंगची आयोजन करण्यात आले होते.मीटिंग मध्ये अनेक विषय घेण्यात आले लेक लाडकी योजनेबाबत सेतू केंद्र तलाठी कार्यालय ग्रामपंचायत नेट कॅफे यांच्या विषयी चर्चा करण्यात आली जर कोणाला त्रास होत असेल जे अधिकारी पैसे घेत असेल ज्यांच्याकडून घेण्यात आले अशा व्यक्तींनी किंवा महिलांनी प्रहार जनशक्ती पार्टी नागगभीड तालुक्याचे पदाधिकाऱ्यांना किंवा प्रहार सेवकांना तात्काळ फोन करून सांगावे अधिकाऱ्याचे निलंबन करण्यात येईल.
प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चुभाऊ कडू 5 जुलै ला वाढदिवस असल्यामुळे त्याचप्रमाणे चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष शेरखान पठाण यांच्या वाढदिवस असल्यामुळे कार्यक्रम नियोजन ग्रामीण रुग्णालय नागभीड येथे दिनांक 5/07/2024 ला सकाळी 9.00 वाजता फळ वाटप, वृक्षारोपण,नागभीड येथे स्वामी विवेकानंद मतिमंद शाळेमध्ये फळ वाटप कार्यक्रम घेण्यात येत आहे तरी प्रहार जनशक्ती पार्टीचे पदाधिकारी आणि प्रत्येक कार्यकर्ते उपस्थित राहावे. यावेळी मीटिंगमध्ये उपस्थित प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाप्रमुख वृषभ भाऊ खापर्डे, शहर प्रमुख नानक नाकाडे, युवा शहराध्यक्ष प्रमोद सुरपाम, विद्यार्थी तालुकाध्यक्ष नागेश कावळे, दिव्यांग तालुका अध्यक्ष प्रमोद डोंगरे, शहर उपाध्यक्ष दिगांबर कंकावार, मागंली शाखाप्रमुख संदीप देशमुख,कुनघाडा चक शाखाप्रमुख हिवेक दडमल, मैशी शाखाप्रमुख प्रणय आंबोने, नवखळा शाखाप्रमुख गौरव जांबुळे, नागभीड शहर संघटक संतोष जीवतोडे, ही सर्व पदाधिकारी उपस्थित होते.