जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण
मो.9665175674
(भंडारा)- पतंजलि योग समिती खोकरलाच्या वतीने आचार्य बाळकृष्ण महाराज यांचा जन्म दिन जडीबुटी दिन म्हणून मोठ्या उत्साहात नुकताच साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजेश डोर्लिकर होते. उद्घाटन शिक्षक रत्न पुरस्कार प्राप्त राहुल मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून योग शिक्षक मारोती पुडके, योग शिक्षक तथा सामाजिक कार्यकर्ते विलास केजरकर, पतंजलि योग समितीचे अध्यक्ष यशवंत बिरे, योग शिक्षक अंजली बोरकर, दिलीप वालदे, ग्राम पंचायत सदस्य सुरेश घोडे, शालीनी बैस इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी आचार्य बाळकृष्ण महाराज यांचे जिवन कार्य व जडीबुटी दिनाचे महत्त्व सांगितले. तसेच वृक्षारोपण,वृक्षसंवर्धन, जलसंवर्धन व जडीबुटी दिनाचे महत्त्व यावर मान्यवरांनी विविध मार्मिक उदाहरण देऊन सविस्तर मार्गदर्शन केले.आणि उपस्थितांच्या हस्ते तुलश, तरोटा, गुळवेल, कडूलिंब, कोरपड, कंबरमोडी, धतोरा, बेल, शतावरी, जगन्नाथ अशाप्रकारे विविध जडीबुटीचे महत्त्व सांगून वितरण करण्यात आले. तसेच खोकरला येथील नाल्याच्या काठावर विविध प्रजातींचे वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रमेश बुरबादे व प्रास्ताविक योग समितीचे अध्यक्ष यशवंत बिरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार गणेश सार्वे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता छाया मेश्राम, दामोधर बोदेले, गणेश उपासे, गीता आगासे, प्यारेलाल शहारे, राजकुमार वहाणे, सुरेंद्र पांडे, महादेव खोकले, महादेव वंजारी, मंदा चावरे, जयश्री दुधकवार, रजनी कुकडकर, कल्पना दमाहे, पंचकुला पटले, लक्ष्मीनारायण भिवगडे, वनिता अतकर, मिना रोखडे, रंगारी, शामराव गौरी, रामलाल शेंडे, केशव खोटेले, महादेव चांदेवार, शोभाताई डुंभरे, खेमचंद रोटके, पंचफुला पटले, श्रीकृष्ण जिभकाटे, बंडू बेहरे, प्रमिला बुरबादे, बाबुलाल दमाहे, श्रध्दा पांडे, शितल रामटेके, मिना चावरे, तेजराम बहेकार, ओमकांता भोंदे, वंदना धांडे, विद्या सार्वे, बाबुलाल दमाहे, नितीन कढव, कृष्णा गुणेवार तसेच पतंजली योग समिती खोकरलाच्या महीला -पुरूष योग साधकांनी सहकार्य केले.