Breaking News

शेवगाव नगरपरिषदे मधील अनागोंदी कारभार व भ्रष्टाचार याची चौकशी करा

दिलेल्या निवेदनातील सर्व विषय तातडीने मार्गी न लागल्यास तहसील कार्यालय शेवगाव येथे आमरण उपोषणाचा इशारा देत दिले निवेदन

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755

शेवगाव :- महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानअंतर्गत शेवगाव शहर पाणी पुरवठा योजनेचे काम तातडीने चालू करणे बाबत, किंवा त्या योजनेची फेर निविदा करणे बाबत व संबंधित कामात दिरंगाई करणाऱ्या वर योग्य ती कारवाई करने बाबत.शेवगाव नगर परिषदेला पूर्ण वेळ मुख्याधिकारी मिळणे बाबत,शेवगाव शहरात असलेल्या घाणीच्या साम्राज्यावर तातडीने उपाय योजना करणे बाबत शहरातील बंद पडलेल्या स्ट्रीट लाईट तातडीने चालू करणे बाबत शेवगाव नगरपरीषदेचे सर्व विभागाचे सोशल ऑडिट करण्या बाबत . शेवगाव शहरामधे झालेला प्रस्तावित DPR चूकीच्या पद्धतीने झालेला असून त्याचे पून निरीक्षण करण्या बाबत.वरील सर्व विषय तातडीने मार्गी न लागल्यास तहसील कार्यालय शेवगाव येथे आमरण उपोषण करण्याचे निवेदन दिले.

१]शेवगाव शहर मधील महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान अंतर्गत शेवगाव शहर पाणी पुरवठा योजनेचा कार्यारंभ आदेश दि.७/2/2023 रोजी देण्यात आला परंतू आज पर्यंत जवळजवळ, १ वर्षे पूर्ण होऊन सध्या संबंधित ठेकेदाराने योजनेचेकाम अद्याप पर्यंत चालू केलेले नाही. या संबंधात आम्ही यापूर्वी वेळोवेळी न.प.मुख्याधिकारी,उपविभागीय अधिकारी (तत्कालीन प्रशासक) जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिले असून या सदर्भात जिल्हाधिकारी साहेब व ठेकेदार यांच्या सोबत दोन वेळेस बैठक झाली असून त्यावेळेस संबंधित ठेकेदार व सर्व सक्षम अधिकारी हजर होते परंतू त्यानंतर संबधित कामा मध्ये कुठलीही प्रगती झाली नाही, आज संबंधित योजनेचे काम बंद असुन संबधित ठेकेदराने अनामत रकमेची बँक गॅरंटी बनावट दिली म्हणून त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु जी बँक गॅरंटी ठेकेदाराने दिली ती खरी की खोटी याची शहानिशा न करता अधिकाराने ठेकेदारला कार्यारंभ आदेश कसा दिला ? या मागे काही मिलीभगत आहे का? याचा ही तपास करण्यात यावा.

तसेच यामधे जसा ठेकेदार दोषी आहे तसेच दोषी अधिकाऱ्यावर पण तपास करून कारवाई करण्यात यावी.संबधित योजने मध्ये प्रशासकीय मान्यता व टी.एस ची व अंदाजपत्रक बनवण्यासाठी तांत्रिक सल्लागार म्हणून मानव सेवा या एजन्सी ची नेमणूक करण्यात आली होती. या एजन्सी ने केलेल्या सर्वेक्षण मधे गंभीर अशा त्रुटी आढळून आल्या.त्यामध्ये प्रामुख्याने जल शुद्धिकरण ची जागा नगरपरिषदे च्या ताब्यात नाही तसेच जल कुंभा, साठी दाखवलेल्या जागा नियमानुसार लागणाऱ्या उंची वरती नाही .त्यामुळे योजना चालू होवू शकत नाही असे ठेकेदाराने लेखी पत्र दिले. जर पानी योजने मध्ये एवढ्या प्रमाणात गंभीर त्रुटी असताना कामाची निविदा – का काढण्यात आली? यात संबधित अधिकारी व तांत्रिक सल्लागार दोषी असल्याचे निदर्शनास येते.

तरी वरील विषयाला अनुसरून जिल्हाधिकारी साहेब यांनी चौकशी समिती नेमून जे दोषी आढळतील या सर्व दोषी वर १५ दिवसाच्या आंत योग्य ती कारवाई करावी.तसेच पानी योजनेचे काम तातडीने सुरू करावे अथवा त्या कामाचे फेर निविदा करण्यात याव्या शेवगाव व न.प.स्थापन झाल्या पासून ठराविक कालावधी सोडता कायम प्रभारी मुख्याधिकारी म्हणूनच काम चालू आहे त्यामुळे शेवगाव शहराचे विकास काम थांबले असून लोकाची दैनिक काम होत नाही तरी कायम स्वरूपी मुख्याधिकारी यांची नेमणूक करण्यात यावी. न.प.कार्यालय शहरापासून ३ किमी दूर असून लोकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते तरी नगरपरिषद कार्यालय शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी करण्यात यावे.शहरामध्ये मोठ्‌या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे त्या मुले साथीचे आजार होऊन नागरिकाचे आरोग्य धोक्यात येत आहे. तसेच घनकचरा व्यवस्थापनाचे काम दिलेल्या ठेकेदाराची मुदत संपली असून घन कचरा व्यवस्थापनाचे काम बंद आहे. ते तातडीने निविदा काढून सुरू करण्यात यावेत शेवगाव शहरातील स्ट्रीट लाईट खूप ठिकाणी बंद पडलेल्या अवस्थेत आहेत तर काही ठिकाणी लाईटचे पोल आहेत पण त्यावर बल्ब नाहीत. काही ठिकाणी हायमैक्सचे पोल उभे केलेले आहेत पण त्यावर सुध्दा बल्ब नाहीत ते तातडीने बसव ण्यात यावे.

६]शेवगाव नगर परिषद मध्ये खूप मोठा सावळा गोंधळ आहे . मोठ्या प्रमाणात चुकीच्या नोंदी चुकीचे आदेश न केलेल्या कामांची बिले काढणे, सर्व विकास कामा मध्ये ई निविदा काढल्या नंतर नियमानुसार ई निविदा काढून सुद्धा फेर निविदा करणे असे अनेक घोटाळे व भ्रष्टाचार करण्यात आले आहे त्या संदर्भात विशेष ऑडिट करून ३० दिवसाच्या आत रिपोर्ट घेऊन कार्य वाही करण्यात यावी.शेवगाव शहराचा प्रस्तावित विकास आराखडा तयार करून प्रशासनास सादर करण्यात आले आहे परंतु त्या विकास आरखड्या संदर्भात वेळोवेळी नागरिकांच्या व नगरसेवक यांच्या वारंवार तक्रार केलेल्या असून प्रशासनाने त्या बद्दल कसलीही दखल घेतलेली नाही संबंधित विकास आराखडा चुकीच्या पद्धतीने करण्यात आला आहे.ज्या भागात नागरी वस्ती होऊ शकत नाही त्या ठिकाणी एलो झोन टाकण्यात आला व वेगवेगळे झोन टाकण्यात आले ते चुकीच्या पद्धतीने व अधिकाऱ्याच्या व मनमानी पद्धतीने करण्यात आले नगर परिषद मध्ये बॉडी अस्तीत्वात नसल्याने शहर वाढीच्या दृष्टीने विचार झालेला दिसत नाही. त्या मुळे नव्याने विकास आराखडा तयार करण्यात यावा ही विनंती तरी जिल्हाधिकरी साहेब यांना नम्र विनंती आहे की वरील विषयांवर १५ दिवसाच्या आत योग्य ती कार्यवाही न केल्यास दिनांक १७/७/२०२४ बुधवार रोजी तहसील कार्यालय समोर शेवगाव येथे आमरण उपोषण करण्यात येईल.

*ताजा कलम*

गल्ली ते दिल्ली राज्यात आणि केंद्रात गेली 10 वर्षे भारतीय जनता पार्टीची सत्ता असताना शेवगाव शहरामध्ये कुठल्याही प्रकारचा विकास झाला नाही नगरपरिषदेचा सगळा कारभार “आंधळ दळतय आणि कुत्र पीठ खातय” असा झाला आहे त्या दुर्दैवाची गोष्ट सत्ताधारी पक्षाच्या मोठ्या नेत्यालाच तालुका प्रतिनिधी च्या विरोधात आंदोलन करावे लागते यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट शेवगावकरांच्या दृष्टीने कुठलीही नाही पाथर्डी शहरापेक्षा शेवगाव शहराचा पाणी प्रश्न गंभीर असून त्यांची योजना जवळजवळ 60% पूर्ण झाली आहे शेवगाव शहराच्या योजनेच अजून कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या हेच सुरू आहे.

*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता पत्रकार*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

नवनियुक्त जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांनी स्वीकारला कार्यभार

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा )- नवनियुक्त जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांनी आपल्या पदाचा कार्यभार …

मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वाखाली वरोरा-भद्रावती विधानसभेत प्रचाराला वेग

एक हजार टी-शर्टचे वितरण, निवडणुकीसाठी भक्कम तयारी सुरू जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर भद्रावती :-  शिवसेना (उद्धव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved