जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- चिमूर तालुक्यात आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या पुढाकारातून श्रीमती. मनिषाताई मनियार, सौ.मेघाताई मितेशजी भांगडीया, सौ.अपर्णाताई कीर्तिकुमार भांगडीया, पार्थ भांगडीया, गौरव भांगडीया व रुद्र भांगडीया यांच्या हस्ते चिमूर तालुक्यातील भिसी-आंबोली जिल्हा परिषद क्षेत्रातील पुयारदंड, गडपिपरी, आंबोली, सिरपूर, बोरगाव (बुट्टी), आंबेनेरी, कपर्ला, पारडपार व टिटवी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना दरवर्षीप्रमाणे यंदाही शुभेच्छारुपी नोटबुक वितरीत करून नविन शैक्षणिक सत्रात त्यांचे स्वागत करण्यात आले. मागील अनेक वर्षांपासून आमदार बंटीभाऊ भांगडीया व भांगडीया फाउंडेशनच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात.
या नोटबुक वितरण कार्यक्रमाप्रसंगी भांगडीया परिवारातील सदस्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करून त्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. दरम्यान, विविध ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांनी सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ भेट देऊन उत्स्फूर्तपणे स्वागत केले. यावेळी सर्व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.