मांडेसर येथे मोहाडी पोलीस स्टेशनच्या वतीने आयोजित प्रबोधन कार्यक्रमात प्रतिपादन
जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण
मो.9665175674
( भंडारा ) – जादूटोणा,भूत – भानामती,करणी, मंत्रतंत्र ,चेटूक,चमत्कार,देवी अंगात येणे, जोतीष्य,बुवाबाजी या केवळ अंधश्रद्धा आहेत.या प्रकारांना अशिक्षितांप्रमाने सुशिक्षित सुद्धा नेहमी बळी पडत असतात.यातून समाजात,गावागावात भांडणे निर्माण होवून एखाद्याचा बळी घेतला जातो.अश्या घटना होवू नयेत,यासाठी प्रत्येकाने वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासावा.अंधश्रद्धा निर्मूलन हेच खरे राष्ट्रहित आहे,असे प्रतिपादन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती तुमसर तालुका संघटक प्रा.राहुल डोंगरे यांनी केले.मोहाडी पोलीस ठाणेच्या वतीने’मांडेसर’येथे आयोजित अंधश्रद्धा निर्मूलन प्रचार – प्रसार समाज प्रबोधन कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक प्रदीप पुल्लरवार होते.यावेळी अतिथी म्हणून अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती तालुका तुमसर चे सहसचिव किशोर बोंद्रे होते.
राहुल डोंगरे म्हणाले ,शकुन व नवस,गंडेदोरे,ताईत,ग्रहांचे खडे,मंत्र तंत्र यांना सत्याचा आधार नाही. जोतीष्य, हस्तरेखाशास्त्र विज्ञान नाही. अंधश्रद्धा ही समाजाला लागलेली कीड आहे.त्याचे निर्मूलन कसे करता येईल याकरिता प्रा.राहुल डोंगरे यांनी वैज्ञानिक प्रयोगातून अग्नी प्रज्वलित केले.कानाने चिट्टीवरील नावे वाचून दाखविले.जळते कापूर भक्षण करून दाखवले.निंबुतून केस काढून दाखविले. पेचकस द्वारे तांदुळ भरलेला तांबे वर उचलून दाखविले.वैज्ञानिक प्रयोगातून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक लोहित मतानी,अप्पर पोलीस अधिक्षक ईश्वर कातकडे यांनी या उपक्रमाला चालना दिल्यामुळे अनेकांचे गैरसमज दूर होतील व कुणीही भोंदू बाबांना बळी पडणार नाही असे अपेक्षित आहे.यावेळी दिलीप गडबडी सव्वालाखे पोलीस पाटील मांडेसर,महेश नंदनवार सव्वालाखे पोलीस पाटील रामपूर,सौ.सीमा रामदयाल बशिने पोलीस पाटील खुटसावरी ,सरपंच सव्वालाखे,आशिष वालदे व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन किशोर बोंद्रे यांनी केले.तर आभार अतुल प्रकाश कुंभलकर यांनी मानले.