जिवंत इलेक्ट्रीक विद्युत तारेमुळे अनेकजण बचावले
चिमूर क्रांती बहुजन फाऊंडेशन आले तात्काळ मदतीस धावून
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर : – दिनांक.२४/०७/२०२४ बुधवार ला चिमूर वरून वरोरा जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई या मार्गावर अतिवृष्टीमुळे प्रादेशिक वन विभाग कार्यालय चिमूर च्या आवारातील वृक्ष अचानक हायटेन्शन लाईन च्या जिवंत विद्युत तारेवर पडल्याने तात्काळ चिमूर क्रांती बहुजन फाउंडेशन यांनी या घटनेची तात्काळ दखल घेत विद्युत महावितरण कार्यालयाशी संपर्क साधून तात्काळ जिवंत विद्युत प्रवाह थांबवून अनेकांचे जीव वाचविण्याचे कार्य केले तर वृक्ष महामार्गावर पडल्याने पूर्णपणे बंद झालेला मार्ग सुद्धा चिमूर क्रांती बहुजन फाऊंडेशन च्या समूहाने धाव घेत मार्ग सुरळीत करून देण्यासही सहकार्य केले.
यामध्ये मोठी जिवीतहानी होता – होता टळली असून अशाप्रकारचे उपक्रम चिमूर तालुक्यात प्रथदर्शनी दिसून येत असल्याने या फाऊंडेशनचे अनेकांनी कौतुक केले तर पुढील वाटचालीस शुभेच्छा सुद्धा दिल्या यावेळी या उपक्रमामध्ये गौतम पाटील , प्रवीण मोदी, अक्षय नागरीकर, रोहन नन्नावरे, अमित मोदी, मयूर डाहुले, विलास मोहिनकर, श्याम दुधनकर, सुनील हिंगणकर, शार्दूल पचारे तथा आदी उपस्थित होते.