Breaking News

शालेय क्रिडा स्पर्धेत शिक्षकांनी सहभागी व्हावे – जिल्हा क्रीडा अधिकारी लतिका लेकुरवाळे

तालुका स्तरिय बैठक संपन्न

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण
मो.9665175674

(भंडारा)– जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय भंडारा व तालुका क्रीडा समिती भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका स्तरिय बैठक जे.एम. पटेल महाविद्यालयात नुकतीच घेण्यात आली.बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा क्रीडा अधिकारी लतिका लेकुरवाळे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून जे.एम. पटेल महाविद्यालयातील शारीरिक व क्रीडा शिक्षक डॉ. भिमराव पवार, कुस्ती स्पोर्ट्स ॲकेडमीचे प्रशिक्षक विलास केजरकर, क्रीडा अधिकारी निखिलेश तभाणे, विकास गायकवाड, क्रीडा मार्गदर्शक मंगेश गुळघे, तालुका क्रीडा समिती संयोजक बेनिलाल चौधरी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

होऊ घातलेल्या शालेय क्रिडा स्पर्धेत क्रीडा शिक्षकांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी लतिका लेकुरवाळे यांनी केले आहे. तालुका स्तरिय बैठकीत बोलत होत्या .त्यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी लतिका लेकुरवाळे यांनी मागील स्पर्धेचा आढावा घेतला. व या स्पर्धेमध्ये काय बदल करावा लागेल याबाबत क्रीडा शिक्षकांच्या प्रतिक्रिया नोंदवून घेतल्या होत्या. मात्र क्रीडा शिक्षकांनी क्रीडा विभागाकडून पाहिजे त्याप्रमाणात सहकार्य मिळत नसते. तसेच क्रिडागंणात अपूऱ्या सोईसुविधा व काही खेळाकरिता क्रिडागण नसल्याचे सांगितले. त्यावर जिल्हा क्रीडा अधिकारी लतिका लेकुरवाळे यांनी मागील स्पर्धेत झालेल्या त्रृट्यांची पुर्तता पुर्ण करुन क्रिडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.

शालेय क्रिडा दिनांक २ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२४ पर्यंत सकाळी ९.३० वाजता शालेय तालुका क्रीडा सत्राचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल भंडाराच्या पटांगणावर करण्यात आले आहे.
त्यात तालुक्यातील जिल्हा परिषद व खाजगी शाळेत शिक्षण घेणाऱ्या १४, १७ व १९ वर्षीय विद्यार्थी -विद्यार्थ्यींनींनी भाग घ्यावे असे आवाहन क्रीडा अधिकारी विकास गायकवाड यांनी केले आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका क्रीडा समिती संयोजक बेनिलाल चौधरी व प्रास्ताविक क्रीडा मार्गदर्शक मंगेश गुळघे यांनी केले तर उपस्थितांचे आभार सुनिल खिलोटे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धनंजय बिरणवार, शाम देशमुख, अरूण बांडेबुचे, सुनिल पंचबुध्दे, अंकित भगत, विलास पराते, विवेक चटप, सुयोग जांभुळकर, राहुल पाठक, राजेश गेडाम, ठाणेश्वर भोयर इत्यादी क्रिडा शिक्षक -शिक्षिकांनी सहकार्य केले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी तातडीने निर्णय घ्या

शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांची गोंडवाना विद्यापीठाला मागणी जिल्हा प्रतिनिधी – सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- …

गणेशोत्सव व ईद ए मिलाद निमित्त चिमूर पोलिसांनी काढला रूट मार्च

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर शहरासहित तालुक्यात शांतता सुव्यवस्था प्रस्थापित व्हावी. आणि आगामी होणारे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved