जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ
राळेगाव :- राळेगाव तालुक्यातील वडकी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मौजा खैरगाव (जवादे) येथे अवैधरित्या दारू विक्री होत असल्याची तक्रार दिनांक ७ ऑगस्ट रोजी गावातील महिला व पुरुष यांनी वडकी पोलीस स्टेशनला दिली होती. सदर या तक्रारीची दखल घेत वडकी पोलीस स्टेशनला नव्याने रुजू झालेले ठाणेदार सुखदेवय भोरकडे यांनी खैरगाव (जवादे) येथील दारू विक्रेत्यावर गुन्हा दाखल करून खैरगाव (जवादे )येथील दारू बंद केली आहे.सदर तुझ्या तक्रारीवरून माझी दारू बंद केली म्हणून तक्रार करते राजु कुळसंगे यांना बेदम मारहाण करून यांच्या जवळचे दोन मोबाईल हिसकावून घेतले आहे.
सदर याबाबत राजु कुळसंगे यांनी पुन्हा वडकी पोलीस स्टेशनला दारू विक्रेत्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली असून यांच्या तक्रारीवरून अमीत नरेश पोहनकर वय अंदाजे २५ वर्ष , समीर उर्फ अण्णा नरेश पोहनकर वय अंदाजे २३ वर्ष, पवन विनोद तामगाडगे वय अंदाजे २५ वर्ष, अविनाश बंडू अलोने वय अंदाजे ३० वर्ष राहणार खैरगाव (जवादे ) यांना अटक करून यांच्यावर वडकी पोलीसांनी कलम ३०९(६) १२६,(२) ११५,(२) भारतीय न्याय संहितेनुसार मारहाण व मोबाईल चोरी प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल केला असून चारही आरोपींचा पीसीआर घेण्यात आलेला आहे सदर वडकी पोलीस स्टेशनला नव्याने रुजू झालेले ठाणेदार सुखदेव भोरकडे यांनी वडकी सर्कल मध्ये कारवाईचा बडगा सुरू केल्याने अवैद्य धंदेवाल्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.