शेअर मार्केटच्या नावाखाली नागरीकांना गंडा घालणाऱ्या दोघांना उत्तरप्रदेशातील वृंदावन, मथुरा येथे सापळा रचून पकडले ‘नगर एल.सी.बी.ची दबंग कारवाई
अविनाश देशमुख शेवगांव – 9960051755
शेवगाव :- याबाबत सविस्तर वृत्त असे की शेअर मार्केट च्या नावाखाली गंडा घालणाऱ्यां भामट्या बिग बुल्स उर्फ महाराज मंडळींना उत्तरप्रदेशामध्ये अटक अहमदनगर एल.सी.बी’. चे प्रमुख दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली कामगिरी शेअर मार्केटच्या नावाखाली नागरीकांना गंडा घालणाऱ्या दोघांना उत्तरप्रदेशातील वृंदावन, मथुरा येथे जाऊन पकडण्याची कामगिरी ‘नगर एलसीबी’ ने केली आहे. हरिभाऊ गणपत अकोलकर महाराज (वय ३९), महेश दत्तात्रय हरवणे महाराज (वय ३८ दोन्ही रा. भायगांव, ता. शेवगांव) असे पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक श्री राकेश ओला अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री प्रशांत खैरे यांच्या आदेशानुसार एल.सी.बी. पोलिस निरक्षक दिनेश आहेर यांच्या सूचनेनुसार एलसीबीचे पोउपनि पोकॉ अमृत तुषार धाकराव, आढाव, विशाल तनपुरे, फुरकान शेख, प्रशांत राठोड आदिंच्या टिमने ही कारवाई केली.
शेवगांव पोलिस ठाण्यात गुरनं. ६६२/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ४२०, ४०६, ४०९, ३४ प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. या दाखल गुन्ह्याचा तपास लावून गुन्हेगारांना अटक करण्याचे आदेश एससीपी राकेश ओला यांनी ‘नगर एलसीबी’ ला दिले होते. एलसीबीला मिळालेल्या माहितीनुसार उत्तरप्रदेशातील वृंदावन ( ता. मथुरा ) येथे जाऊन ‘नगर एलसीबी टिम’ने CENTRALIZED MONITORING SYSTEM AHMEDNAGAR EAT तांत्रिक विश्लेषणाचे आधारे तपास करुन, आरोपीच्या वास्तव्या बाबत माहिती घेता दोघे मिळून आले. पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेऊन पोलीस पथकाची ओळख सांगितली. त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची हरिभाऊ गणपत अकोलकर, महेश दत्तात्रय हरवणे ( दोघे रा. भायगांव, ता. शेवगांव) असे असल्याचे सांगितले.
आरोपीकडे तसेच आरोपी हरिभाऊ अकोलकर याच्यासोबत मिळून आलेला त्याचा मित्र महेश हरवणे यांच्याकडे शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक करुन, अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणुकीबाबत विचारपुस करता आरोपी हरिभाऊ अकोलकर याने गुन्हा दाखल असल्याबाबत व आरोपी महेश हरवणे याने शेवगांव पोलिस ठाण्यात गुरनं. ५९७/२०२४ भादविक ४२०, ४०६, ४०९, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल असल्याने दोघां आरोपींना ताब्यात घेऊन शेवगांव पोलीस ठाण्यात हजर केले आहे. पुढील तपास शेवगांव पोलीस करीत आहे. शेवगाव पोलिसांनी काल आरोपींना शेवगावच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले असता त्यांना 20 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडीची सुनवली आहे पकडलेल्या आरोपींना पाहण्यासाठी शेवगा न्यायालयामध्ये फसवणूक झालेल्या शेकडो गुंतवणूकदारांनी तोबा गर्दी केली होती.
*ताजा कलम*
गेल्या सहा महिन्यापासून सातत्याने निशा गावकर संघटना शेवगाव शहरातील राजकीय सामाजिक संघटना हजारो कुटुंबाची फसवणूक केलेल्या शेकडो बिग बुल्सच्या विरोधात मोठे जन आंदोलन उभारून पाठपुरावा करून पोलीस प्रशासनावर दबाव निर्माण केल्याने गेल्या काही दिवसांपासून गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण वृंदावन बदलून आलेल्या पोलिस अधिकाऱ्यांकडून तपासाची वेगाने सूत्रे फिरवल्यामुळे ऑनलाइन डार क***** फोडणाऱ्या शेअर ट्रेडर्सचे धाबे दान आणले आहे आता बिळात लपलेले उंदीर “टीरीला पायलट इकडे तिकडे पळताना दिसत आहेत”
*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता पत्रकार*