जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर : – चिमूर विधानसभेत बंटीभाऊ सारखा भाऊ चिमूरला मिळणे हे चिमूरकरांचे भाग्य आहे. बंटी भाऊ आम्हाला मुंबईत नाही मिळाले हे आमचे दुर्भाग्य आहे असे वक्तव्य आमदार किर्तिकुमांर भांगडीया यांनी आयोजित केलेल्या रक्षाबंधन कार्यक्रम प्रसंगी चिमूर येथे केले.
तालुका भाजपा महिला आघाडी चिमूर तालुक्याच्या वतीने दिनांक २४ आगस्ट २०२४ रोजी चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किर्तिकुमांर भांगडिया यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या प्रसंगी महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम मराठी चित्रपट अभिनेत्री प्राजक्ता माळी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाला २५ हजार महिलांनी उपस्थिती दर्शविली होती. यावेळी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी महिलांना मार्गदर्शन करते वेळी बंटी भाऊ सारखे भाऊ चिमूरला मिळणे हे चिमूर करांचे भाग्य आहे. बंटी भाऊ आम्हा मुंबई कराना नाही मिळणे हे आमचे दुर्भाग्य आहे असे वक्तव्य केले. यावेळी कार्यक्रमांमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीसांचा चोख बंदोबस्त करण्यात आला होता.