= कालकथित बाजीराव सुकाजी खोबरागडे गुजगव्हान यांच्या स्मृती प्रित्यर्थ =
= खानगांवातील शासकीय सेवेत असलेल्या पुरुप – महिला आंबेडकवादी चळवळीतील योगदान, परिसरातील लोक कलावंत यांचा सत्कार =
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-जागतीक आंबेडकरवादी साहीत्य महामंडळ व बौद्ध पंचकमेटी खानगांव, प्रबुद्ध बुद्ध विहार गुजगव्हान, समता सैनिक दल च्या वतीने पहिले जिल्हास्तरिय आंबेडकरवादी साहित्य संमेलन १९ डिसेंबर रविवार ला तथागताच्या संघारामगीरीतील खानगांव येथील बुद्ध विहार पटांगणात चार सत्रामध्ये आयोजीत करन्यात आला आहे.या आंबेडकरवादी साहीत्य संमेलनाचे उद्धघाटन पुज्य भंते ज्ञानज्योती महाथेरो यांचे हस्ते १९ डिसेंबर रविवार ला सकाळी १० वाजता होनार आहे. या साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष माणिक खोब्रागडे, सागताध्यक्ष घनश्याम रामटेके आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्ष, जागतिक आंबेडकरवादी साहीत्य महामंडळाचे अध्यक्ष दिपककुमार खोब्रागडे, प्रमुख अतिथी ॲॅड. सोनिया गजभिये नागपूर, ॲड. भुपेश पाटील नागपूर, सुधाकर चोखे वरोरा, सरपंच अर्चना रामटेके उपस्थीत राहनार असुन उद्धघाटन सत्राचे प्रास्तावीक निलकंठ शेंडे, भूमीका सुरेश डांगे, स्वागत गित प्रबुद्ध महिला मंडळ सावरी, संमेलनाचे कार्यवाह सुत्रसंचालन प्रा. आत्माराम ढोक, आभार प्रदीप रामटेके करनार आहेत.
संमेलनाच्या पहिल्या सत्रात दुपारी बारा वाजता अलीकडचे कृषी कायदे आणि डॉ आंबेडकरांचे विचार या विषयावर चर्चासत्र होनार आहे या चर्चासत्र कार्यक्रमाचे अध्यक्ष औरंगाबाद येथील प्राचार्य डॉ यशवंत खडसे, वक्ते केशव मेंढे नागपूर, डॉ जगदीश मेश्राम ब्रम्हपूरी, डॉ नामदेव खोब्रागडे गडचिरोली, डॉ रविंद्र तिरपुडे नागपूर उपस्थीत राहनार असुन या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा शिल्या रामटेके व आभार सागर रामटेके करनार आहेत. दुसऱ्या सत्रात दुपारी दीड वाजता आंबेडकरवादी साहित्याचे सामाजीक योगदान या विषयावर चर्चा सत्र होनार आहे. या चर्चा सत्राचे अध्यक्ष डॉ हेमचंद दुधगवळी गडचांदूर,असुन वक्ते डॉ धनराज खानोलकर चंद्रपूर, डॉ प्रकाश राठोड नागपूर, डॉ सर्जनादित्य मनोहर नागपूर, डॉ प्रशांत धनविजय आष्टी या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विनोद गेडाम आभार सुनिता ढोक करनार आहेत. तिसऱ्या सत्रात तिन वाजता कवि संमेलन या कवि संमेलनाचे अध्यक्ष भानुदास पोपट जेष्ठ कवी नेरी, प्रमुख अतिथी जगदीश राऊत, प्रमोद वाळके, मधु बावलकर, भुषण भस्मे, तन्हा नागपूरी, प्रसेनजीत गायकवाड, शालीक जिल्हेकर, आदी उपस्थीत राहनार असुन सुत्रसंचालन मनोहर गजभिये, सुर्यभान शेंडे करनार आहेत. चौथ्या सत्रात पाच वाजता निर्माता, लेखक, गितकार, संदीप गायकवाड व दिग्दर्शक नागेश वाहुरवाघ यांचा लघु चित्रपट क्रांतीगर्भ चा शो होनार आहे.
सहा वाजता समारोपीय कार्यक्रम या कार्यक्रमाचे अध्यक्ष माणिक खोब्रागडे, प्रमुख अतिथी शेगांव पोलीस स्टेशनचे ठानेदार अविनाश मेश्राम, झाडीपट्टीतील विनोद सम्राट डॉ शेखर डोंगरे, प्राचार्य के आत्माराम, जेष्ठ शिक्षक हरी मेश्राम उपस्थीत राहनार असून या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन हिराताई गडमल आभार कार्यवाह प्रा आत्माराम ढोक करनार आहेत.कार्यक्रम दरम्यान खानगावातील शासकीय सेवेत असलेल्या पुरुष महिला आंबेडकरवादी चळवळीतील योगदान, परिसरातील लोक कलावंत यांचा सत्कार वामनराव पाटील प्रतिष्ठान वडसी यांच्या सौजन्याने करन्यात येनार आहे. रात्रो आठ वाजता महाराष्ट्रातील सुप्रसीद्ध गायक उमेश बागडे यांचा भिम क्रांतिचा बुलंद आवाज प्रबोधन कार्यक्रम होनार आहे. या आंबेडकरवादी संमेलनाला उपस्थीत राहण्याचे आवाहन बौद्ध पंचकमेटी खानगांव यांनी केली आहे.