
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर : – दिनांक.०७/०४/२०२२ ला रात्रो गस्त दरम्यान राखीव वन कक्ष क्रमांक.१४ मध्ये गस्त करीत असतांना एम एच ३४ ए ए ००५९ या क्रमांकाचे ट्रॅक्टर हे खोडदा नाल्यातील रेती भरत असतांना पकडले व पुढे ( पि.ओ.आर. नंबर ०९१३४/२२८३३३ ) नुसार वनगुन्हा नोंद करण्यात आला.ट्रॅक्टर मालकाचे नाव प्रविण जनार्धन शामकूरे उर्फ ( माकोडा ) खडसंगी येथील रहिवासी आहे.
यावेळी चौकशी अधिकारी यु.बी.घुगरे क्षेत्रसहाय्यक खडसंगी व कु.आर. के.ढोके वनरक्षक खडसंगी तसेच वनमजुर खडसंगी यांना सोबत घेऊन ट्रॅक्टर वनविश्रामगृह खडसंगी येथे जप्त करण्यात आले.याची मोठ्या प्रमाणावर खडसंगी क्षेत्रात चर्चा रंगली आहे.या कारवाईमुळे रेती माफियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.