
कोराडी : नागपुर शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कोराडी हद्दीतील सुरादेवी येथील रेल्वे क्रॉसिंग लागुन 50 मीटर अंतरावर एका 20 वर्षिय युवतीची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या करण्यात आली.
प्राप्त माहितीनुसार दुपारी 2 च्या सुमारास या परिसरात गुरेढोरे चारणाऱ्या गुराख्यांना ही घटना कळताच त्यांनी सुरादेवी चे सरपंच सुनील दुधपचारे यांना माहिती दिली त्यानंतर कोराडी पोलिसांना सुचना मिळताच कोराडी पो. स्टे. चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रिष्णा शिंदे हे पोलीस बंदोबस्तासह तपासासाठी सुरादेवी जवळच्या रेल्वे क्रॉसिंग जवळील घटनास्थळी पोहचले. घटनेची गांभीर्य लक्षात घेताच नागपुर पोलीस आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त हे सुद्धा पोहचून तपास जलद गतीने करण्याचा व आरोपींच्या धरपकड साठी टीम गठित करुन तपास सुरु केला.
मुलीच्या अंगात लाल टी शर्ट व लैगिन आहे. प्राप्त माहितीनुसार परिसरात प्रेमीयुगल मौजमस्ती करायला येतात. प्रेमप्रकरणातुन ही हत्येची घटना घडल्याचा संशय आहे.