
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-चिमूर नगर परिषदेला कायमस्वरुपी मुख्यधिकारी मॅडम कार्यरत झाले असुन जवळपास एक महिना होत आहे. परंतु अजुनही नियोजन बरोबर दिसुन येत नाही आहे.आणि शासनाचा नियमाने ५ दिवसाचा आठवडा आहे . त्यात आठवळ्यातून १ कीवा २ दिवस त्यांचेकडे सिंदेवाही नगर पंचायतच्या प्राभारी म्हणून नियुक्ती आहे. आणि चिमुर नगर परिषदेला फक्त ३ दिवस बसतात यात. कार्यालयाचे कामे होतात आणि शहरात काहीच लक्ष देत नाही.
१) शहरात स्वच्छता बरोबर होत नाही आहे.
२) शहरात कचरा गाडी प्रत्येक प्राभागत बरोबर जात नाही आहे.
३)शहरात पाणी पुरवठा बरोबर होत नाही आहे.
४) अभ्यंकर मैदान येथील पाण्याची टाकी जीर्ण झाल्यामुळे बंद केली आहे. परंतु पर्याय वेवस्था अजुनही केलेली नाही आहे.
५) शहरात काही ठिकाणी दिवाब्बती बंद आहे. याकडे लक्ष देत नाही आहे.
६) शहरात पावसामुळे खड्डे पडले आहे खड्यात मुरूम किवा चुरी टाकण्यात आली नाही आहे.
७) पंतप्रधान आवास योजनेचे घरकुल संदर्भात लाभर्त्याला पत्र मिळाले परंतु अजूनही पाठपुरावा नाही.
असे अनेक प्रश्न आहे. तरी नगर परिषद याकडे लक्ष का देत नाही शासनाने मुख्यधिकारी यांची ५ ही दिवस नियुक्ती चिमुर नगर परिषदेला करावी असी मागणी. काँग्रेसचे मिडिया प्रमुख पप्पुभाई शेख यांनी केली आहे.