Breaking News

वाघाच्या हल्ल्यात इसमाचा मृत्यू

वाघाचा शोध घेऊन केले जेरबंद

विशेष प्रतिनिधी – भंडारा

भंडारा:- जंगलातील वन्यजीव प्राणी गावात येत असून पाळीव प्राणी व जनावरांवर हल्ला करीत आहे. वाघाच्या हल्ल्यात इसमाला ठार केल्याची बातमी गावकऱ्यांना समजताच पोहचलेल्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांवर संतप्त व्यक्त करीत गावकाऱ्यांकडून हल्ला करण्यात आल्याची घटना भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात खातखेडा येथे घडली आहे. यात तिन वनाधिकारी आणि एक ग्रामीण जखमी झाले असून चौघांना उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले आहे. प्राप्त माहिती नुसार ईश्वर मोटघरे वय वर्षे ६२ इसमाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. तर, निखिल गुरुदास उईके वय वर्षे २२ रा. नांदीखेडा हा युवक गंभीर जखमी झाला आहे.

पवनी तालुक्यात अगदी शेवटच्या टोकावर असलेल्या खातखेडा हे गाव जंगल व्याप्त परिसरात आहे. तिनं दिवसांपूर्वी या परिसरातील गुडेगाव गावातील एकास वाघाने हल्ला करून ठार केले होते. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी गावातील नागरिकांनी रेटून धरली होती.
मात्र, वाघाच्या बंदोबस्तापूर्वीच बुधवारला सकाळी पुन्हा वाघाने हल्ला करून एका इसमाला ठार केले.सध्या खरीप हंगामाची लगबग सुरू आहे. त्यामुळे सतत होत असलेल्या वाघाच्या हल्ल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये घबराटीचे व भीतीचे वातावरण पसरले आहे.

या घटनेनंतर पंचक्रोशीतील गावातील नागरीक घटनास्थळी पोहोचले. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी पथकासह खातखेडा गावात पोहोचले असता यावेळी गावकऱ्यांच्या संतापाला वनाधिकाऱ्यांना सामोरे जावे लागले. संतप्त झालेल्या नागरिकांनी वनाधिकाऱ्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात सहाय्यक वनसंरक्षक यशवंत नागुलवार हे गंभीर जखमी झालेत. तर अन्य ही गंभीर जखमी झालेत. दरम्यान, गावकऱ्यांचा रोष बघता वनाधिकारी मिळेल त्या दिशेने सैरावैरा पळाले.गावकऱ्यांनी केलेल्या हल्ल्यात सहायक वनसंरक्षक यशवंत नागुलवार वय वर्षे ५७, शैलेश देवेंद्रप्रसाद गुप्ता वय वर्षे ५६, दिलीप वावरे वय वर्षे ५२ हे गंभीर जखमी झालेत. या गंभीर चौघांना पवनी येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना पुढील उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आलं आहे.

घटनेची माहिती होताच, जिल्ह्यातील संपूर्ण वनपरिक्षेत्राधिकारी त्यांचे पथक, नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची रॅपिड ॲक्शन टीम दाखल झाली. पोलिसांचा तगडा बंदोबस्त गावात तैनात करण्यात आला. गावकऱ्यांचा रोषाला सामोरे जावे लागल्यानंतर वनाधिकाऱ्यांनी ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीनं वाघाचा शोध घेत त्याला ट्रँग्यूलाईज करून सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास जेरबंद केलं. वाघाला जेरबंद केल्यानंतर ग्रामीण गावकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

हॉलिवूडची रहस्यमय ‘भुताटकी’ भेटायला येत आहे

मुंबई-राम कोडींलकर मुंबई:-रसिक प्रेक्षकांचं चित्त वेधून घेणारा हॉलीवूडचा सुपरहिट रहस्यमय चित्रपट ‘डोन्ट लुक अवे’ आता …

छत्रपती शाहू महाराजांच्या कार्यामुळे तख्त दिल्लीचे अन लक्ष्य महाराष्ट्राचे स्वप्न साकार – राहुल मेश्राम

भिलेवाडा येथे संस्कार शिबिरात मार्गदर्शन जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- हिंदवी स्वराज्य स्थापनेतुन महाराष्ट्रासह संपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved