Breaking News

रेती डेपोत तस्कराचा धुमाकूळ,अवैध्य वाटपातील रेती जप्त करून घरकुल लाभार्थ्यांना दया

तहसीलदारांना निवेदन, बुकिंग मध्ये गौडबंगाल

तालुका प्रतिनिधी-शशिम कांबळे राळेगाव

राळेगाव:-गरजू व्यक्ती ला कमी दरात रेती मिळावी, रेती तस्करीला आळा बसावा या उदात्त हेतूने रेती डेपो निर्माण करण्यात आले मात्र आता हे रेती डेपोच लुटीचा अड्डा बनले आहे.र आता -आता सुरु झालेल्या घाटावर बनावट बुकिंग करत असल्याच्या तक्रारी असून या मुळे घरकुल लाभार्थ्यांना शिल्लक साठाच मिळत नाही, त्यांना माहिती देखील पडत नाही. धर्मापूर घाटावर बुकिंग करून उचल केलेल्या रेती धारकांचे आधार कार्ड वरील नाव पाहून यातील किती जणांचे बांधकाम सुरु आहे याची माहिती घ्यावी, व यातील रेती जप्त करून गरजू घरकुल लाभार्थ्यांना निशुल्क वाटप करावी अशी मागणी पुढे आली आहे.

या बाबत शशिकांत उर्फ बाळू धुमाळ व नागरिकांनी तहसीलदार राळेगाव यांना निवेदन दिले. महसूल प्रशासनाने बुकिंग करण्यात आलेल्या व वाटप झालेल्या लाभार्थ्यांच्या बांधकामाची चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे हे कामं अजिबात कठीण नाही कारण गाव पातळीवर महसूल चे कर्मचारी आहे. एका दिवसात यातील भ्रष्टाचार बाहेर येऊ शकतो.घरकुल लाभार्थ्यांना रेती भेटत नाही आणि रेती तस्करांच्या गाड्या रात्री अपरात्री सुरु आहे.

त्या सोबतच डेपो वरून मोठ्या प्रमाणात बाहेर जिल्ह्यात रेती जात आहे, हा अन्याय आहे. स्थानिकांना रेती मिळत नाही व बाहेरच्यांना पायघड्या अंथरून बोलावून रेती देण्याचा हा प्रकार अजिबात खपवून घेतला जाणार नाही. चुकीच्या पद्धतीने वाटप करण्यात आलेली रेती जप्त करण्यात यावी व गरजू घरकुल लाभार्थ्यांना वाटप करण्यात यावे अशी सुद्धा मागणी करण्यात आली आहे.वरील मागण्या या जनहिताच्या आहे, याची गांभीर्याने दखल घेण्यात यावी, दोषींवर कारवाई करण्यात यावी व सामान्य गरजू लाभार्थ्यांना वाजवी दरात रेती मिळण्याचा मार्ग प्रशस्त करण्यात यावा अन्यथा जनहितार्थ तीव्र आंदोलन करु असा इशारा देण्यात आला आहे.निवेदन देतांना शशिकांत उर्फ बाळू धुमाळ, प्रकाश खुडसंगे, पराग मानकर, रौफ शेख, गौतम तागडे, आकाश कुळसंगे, प्रवीण सेलवटे, गजू मोंडे, प्रमोद वणकर, संजय सातपुते, प्रफुल नागोसे, प्रशांत बेंबारे आदी सह नागरिक उपस्थित होते.

—————–

बांधकाम हा सर्वात जास्त रोजगार देणारा व्यवसाय आहे. बांधकामाकरिता रेती हा अत्यावश्यक घटक आहे. रेती मुळे बांधकाम व्यवसाय ठप्प पडला. शासनाने कमी दरात रेती देण्याचे धोरण आखले पावसाळा सुरु होत असतांना तालुक्यात एक डेपो सुरु झाला त्याच्याही अठरा भानगडी आहेत. बुकिंग केली तरी रेती भेटत नाही. घर्मापूर रेती घाटात जप्त करण्यात आलेला एक हजार ब्रास चा रेती साठा आहे. तो घरकुल लाभार्थीना मोफत देण्यात यावा तेथूनही रेती चोरी जात असल्याची माहिती आहे. हा खूप मोठा गैरव्यवहार आहे. बाहेर जिल्हात एक ट्रक जरी रेती गेली व इथल्या सामान्य माणसाला रेती मिळाली नाही तर हे खपवून घेणार नाही.प्रसंगी त्या घाटात जलसमाधी घेऊ पण स्वस्थ बसणार नाही -शशिकांत उर्फ बाळू धुमाळ

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

श्रीमती विद्या गाडेकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या ओ. बी. सी. सेलच्या प्रदेश सचिव पदावर निवड सौ. सुनंदा राजेंद्र पवार यांच्या हस्ते बारामती येथे नियुक्तीपत्र प्रदान

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव  9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर …

त्या दोन लीडरला गुंतवणूकदारांनी दिला चौप

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की सध्या वादात असलेल्या कोट्यावधी रुपयांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved