Breaking News

दिवंगत ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी मराठी मनांत अजरामर राहतील – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

प्रतिनिधी – जगदीश का.काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/कामगार समस्या सल्लागार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई:-ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनामुळे मराठी चित्रपट सृष्टी ची कधीही भरून येणार नाही अशी हानी झाली आहे. आपल्या कसदार अभिनयाचा अमिट ठसा मराठी सिनेसृष्टीवर उमटविणारे ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी मराठी चित्रपट रसिकांच्या मनांत कायम अजरामर राहतील अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी दिवंगत ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

दिवंगत ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांनी अनेक मराठी सिनेमात काम केले. त्यांनी साकारलेल्या भूमिका अजरामर ठरल्या. मुंबईचा फौजदार मधील त्यांची भूमिका लोकप्रिय झाली. ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनाने अभिनयाचा तेजस्वी तारा निखळला आहे अशी शोकभावना ना.रामदास आठवले यांनी पाठवलेल्या शोकसंदेशात व्यक्त केली आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

हॉलिवूडची रहस्यमय ‘भुताटकी’ भेटायला येत आहे

मुंबई-राम कोडींलकर मुंबई:-रसिक प्रेक्षकांचं चित्त वेधून घेणारा हॉलीवूडचा सुपरहिट रहस्यमय चित्रपट ‘डोन्ट लुक अवे’ आता …

छत्रपती शाहू महाराजांच्या कार्यामुळे तख्त दिल्लीचे अन लक्ष्य महाराष्ट्राचे स्वप्न साकार – राहुल मेश्राम

भिलेवाडा येथे संस्कार शिबिरात मार्गदर्शन जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- हिंदवी स्वराज्य स्थापनेतुन महाराष्ट्रासह संपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved