Breaking News

१६ ऑगस्ट पूर्वी क्रांतिभूमि चिमूर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय द्या

हिच शहीद क्रांतीविराना खरी श्रद्धांजली

तेली समाजाचे चंद्रपुर जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण कावरे यांची मागणी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:-चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर क्रांती शहर देशात स्वातंत्र्य चळवळी पासून प्रसिद्ध असून चिमूर क्रांती जिल्ह्याची मागणी प्रलंबित असली तरी चिमूर लोकसभा क्षेत्र असल्याने चिमूर येथे मेडिकल कॉलेज १६ ऑगस्ट २३ पूर्वी देण्याची मागणी तेली समाज जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण कावरे यांनी केली आहे.चिमूर क्षेत्र आणि ग्रामीण भाग पकडून रुग्णाच्या उपचारासाठी भौगोलिक दृष्टिने चिमूर हे गांव मध्यवर्ती गांव असून व्यावसायिक शिक्षणाचा दृष्टिकोनातून अत्यंत मागासलेले शहर आहे इथे कोणत्याही प्रकारचे उच्च व्यावसायिक शिक्षण देणारी कोणतीही व्यवस्था नाही.

येथे असलेल्या रुग्णालयात पूरेश्या सोई नसल्याने रुग्णालयात छोट्या छोट्या कारनास्तव शंभर किमी दुर जावे लागते.चिमूर शहरात रुग्ण संख्या व अपघाताचे प्रमाण अधिक असल्याने तात्काल उपचार करिता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होने अतिशय महत्वपूर्ण आहे.१६ ऑगस्टला राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेद्र फडणवीस चिमूर येथे शहिदांना नमन करण्यासाठी येत असतात. शहीद क्रांतीविराना खरी श्रद्धांजली ठरावी यासाठी चिमूर इथे वैद्यकीय कॉलेज देण्याची मागणी तेली समाजाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते प्रवीण कावरे यांनी केली आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

लेखिका डॉ. मेधा कांबळे लिखित “आठवणीतील शेवगाव” या पुस्तकाने खोवला मानाचा तुरा

*”आठवणीतील शेवगाव” या डॉ. मेधा कांबळे लिखित पुस्तकाचे 18 मे शनिवार रोजी सकाळी अकरा वाजता …

गेल्या सहावर्षापासून गोगलगायीच्या गतीने काम सुरू

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की डिसेंबर 2018 मध्ये तत्कालीन परिवहन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved