Breaking News

कर्करोगाला सतत दोन वर्ष दिली कडवी झुंज

होतकरू तरुणाचे दीर्घ आजाराने निधन

जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे

यवतमाळ:-यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर तालुका अंतर्गत येत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ४४ वर करंजी( रोड)येथील कु. आकाश अरुण गाडगे वय ३२ वर्ष याला दोन वर्षांपासून कर्करोगाने ग्रासले होते. आकाश हा आपल्या वडिलांसोबत चाय व पानटपरी चा व्यवसाय करीत असे व आपल्या परिवाराचा उदाहरनिर्वाह व
मदत करीत होता. अश्यातच त्याचा कर्करोगाचा त्रास वाढत असल्याकारणाने आकाशला नागपूर येथे दवाखान्यात दाखल करण्यात आले.

डॉक्टरांनी आकाशच्या खालच्या जबड्याचे ऑपरेशन केले नंतर त्याला किमो घेण्यासाठी दवाखान्यात सतत ये जा करावे लागत असे, मात्र शेवटी आजाराला झुंज देत असताना आज दि.२९/७/२०२३ रोजी सकाळी ४ वाजताच्या सुमारास प्राण ज्योत मालवली. त्यामुळे आकाश च्या जाण्याने गाडगे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. समाजातील व परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

शिष्यवृत्ती परिक्षेत वेदांती गभणे विद्यार्थिनीचे सुयश

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा)- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे द्वारा आयोजित प्राथमिक स्तरातुन फेब्रुवारी …

जिल्हाधिका-यांनी घेतला भ्रष्टाचार निर्मुलन समितीचा आढावा

तक्रारी असल्यास संबंधित विभाग किंवा समितीला कळविण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-भ्रष्टाचार निर्मुलनासंदर्भात जिल्हाधिकारी विनय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved