जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे
यवतमाळ:-यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या वडकी येथे दत्तकृपा बहुउद्देशीय संस्था वडकी व आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. मोहित राजेंद्र झोटींग यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त भव्य रोगनिदान, उपचार व रक्तदान शिबिराचे आयोजन दिनांक १२ऑगस्ट रोजी स्मॉल वडर कान्व्हेंट वडकी येथे करण्यात आले.सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र झोटींग हे दरवर्षी स्व. मोहीत यांच्या स्मृतिदिनानिमीत्य सामाजिक जाणिवेतून सामाजिक उपक्रम राबवित असतात. स्व मोहित यांचे सहा वर्षांपूर्वी आजाराने निधन झाले.
होते. आपल्या एकूलत्या एक मुलाचे देहदान करण्याचा निर्णय राजेंद्र झोटींग यांनी घेऊन नागपूर मेडिकल कॉलेजला त्याचा मृतदेह सुपूर्द केला होता हे विशेष. या आरोग्य व रक्तदान शिबिराचे उद्घाटन अमित भोईटे तहसीलदार,यांच्या हस्ते होत. असून कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विनय मुणोत सामाजिक कार्यकर्ता, तर प्रमुख उपस्थिती अक्षय रासणे अतिरीक्त तहसीलदार,केशव पवार गट विकास अधिकारी, ठाणेदार विजय महाल्ले, प्राचार्य मजूंषा सागर, सरपंच शैलेश बेलेकर या मान्यवरांच्या उपस्थितीत आरोग्य व रक्तदान शिबीर संपन्न होईल.दि. १२ ऑगस्टला होणाऱ्या सर्व रोगनिदान शिबिराचां तालुक्यातील नागरीकांनी लाभ घ्यावा व रक्तदान शिबीरात रक्तदान करण्यासाठी तरुणांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन राजेंद्र झोटींग व दत्तकृपा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.