Breaking News

दुचाकी-कार अपघातात एक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

प्रतिनिधी -नागेश बोरकर दवलामेटी

दवलामेटी/वाडी (प्र):-नागपूर-अमरावती महामार्गावर रविवारी रात्री १०.३० च्या सुमारास नागपूर वरून वाडीच्या दिशेने परत येत असताना पोस्टल कॉलनी जवळ दुचाकीची कारला धडक लागल्याने दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला तर मागे बसलेला मित्र गंभीर जखमी झाल्याची घटना वाडी पोलीस स्टेशन अंतर्गत घडली.वाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतक राहुल ज्योतीराम मेश्राम वय-३० वर्ष,रा.आंबेडकर नगर,राहुल चौक वाडी हा स्पेल्डर दुचाकी क्रं. एम.एच.-४०/ए.व्ही-०६६८ ने आपला मित्र किर्ती याला बसून काही खाजगी कामानिमित्त नागपूरला गेला होता परत येत असताना पोस्टल कॉलनी जवळ कार रस्ता ओलांडत असतांना या भरघाव दुचाकीची धडक कारला लागताच हे दोन्ही खाली कोसळले.

डोक्याला शरीराला जबर मार लागल्याने रस्त्यावरील वाहन चालकांनी लागलीच वाडी पोलिसांना याची माहिती दिली.वाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तातडीने नागपूर स्थित मेयो रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी राहुलला मृत घोषित केले. तर गंभीर जखमी कीर्तीवर उपचार सुरू आहे.राहुल ला ३ लहान मुली असल्याने परिसरात त्याच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.वाडी पोलिसांनी व्हॅगनार कार क्रमांक एम.एच.३१-एफ.ई/४१०६ चे चालक साहिल सुनील खोडेचा वय-२० वर्ष रा.काचीमेट,अमरावती रोड यांना ताब्यात घेतले पुढील तपास वाडी पोलीस करीत आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

अनोळखी मृतकाची ओळख पटविण्याकरीता संपर्क करण्याचे आवाहन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 2 : दिनांक 31 मार्च 2024 रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय, …

जिल्ह्यात कामगारांचे कैवारी अवतरले – जिल्हा पोलीस अधिक्षक लोहित मतानी

जागतिक कामगार दिनानिमित्त कामगारांचा सत्कार थाटात जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा):- पावसाळा, हिवाळी व उन्हाळा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved