विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव
शेवगाव:-31 डिसेंबर 2023 रविवार याबाबत सविस्तर वृत्त असे की समाजातील विविध घटकांसाठी शासनाच्या अनेक योजना उपलब्ध आहेत. पात्र लाभार्थ्यांनी निकषाप्रमाणे लागणा-या कागदपत्रांची उपलब्धता करुन दिल्यास त्यांचा लाभ सर्वसामान्य नागरीकांना अधिक सुलभ होईल. आरोग्य विषयक वैदयकीय सोयीसुविधांसाठी आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घ्यावा. नागरीकांच्या सुविधांसाठी म.न.से.ने राबविलेल्या आयुष्यमान भारत कार्ड वाटप उपक्रम स्तुत्य आहे, असे प्रतिपादन तहसलिदार प्रशांत सांगडे यांनी केले शहरातील माळी गल्ली येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शेवगाव तालुकाध्यक्ष गणेश रांधवणे यांनी आयोजीत केलेल्या आयुष्यमान भारत कार्डचे वाटप तहसिलदार प्रशांत सांगडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी झालेल्या कार्यक्रमामध्ये सांगडे बोलत होते. यावेळी शेवगाव तालुका पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष कैलास बुधवंत, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष सचिन सातपुते,रमेश डाके, वसुधा सावरकर,राजश्री रसाळ,जनार्दन रायकर ,दत्तात्रय कांबळे, किरण डाके, आदिनाथ साबळे, विठ्ठल तुपे, संजय गवळी, विठ्ठल दुधाळ,संदिप बडधे, मिलिंद धोंडे,अमोल परदेशी, दत्तात्रय नांगरे, सुनिल गवळी, मंगेश लोंढे आदी प्रमुख उपस्थित होते.
यावेळी माळी गल्लीतील ३१५ नागरिकांना कार्डचे वाटप करण्यात आले. यावेळी संदिप देशमुख, संदेश लोंढे, अनिकेत काथवटे, सुजाता खेडकर,मीराबाई डाके,सविता भुजबळ,बेबी,मरकड, शैला बडधे,ज्योती नांगरे,कमल दहिवाळकर,सुनिता नांगरे राधा साबळे, मनीषा मरकड ,संगीता रायकर,अलका नांगरे, शशिकला शिंदे, कोमल शिंदे ज्योती शिंदे ,चंद्रप्रभा कांबळे कडूबाई पानखडे ,शोभा नांगरे,अनुसया गवळी आदींसह महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्तविक मनसेचे तालुकाध्यक्ष गणेश रांधवणे यांनी तर सुत्रसंचालन सत्यविजय शेळके यांनी केले. तर निवृती आधाट यांनी आभार मानले.
*ताजा कलम*
*महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष गणेश रांधवणे हे वर्षभर विविध सामाजिक व उपक्रम राबवत असतात प्रभाग क्रमांक सात मधील विविध नागरी समस्या आपल्या आंदोलनाद्वारे व प्रशासकीय यंत्रणेच्या लक्षात आणून देऊन सोडवल्या आहेत ते या प्रभागातील नगरसेवक पदाचे प्रबळ दावेदार मानले जातात*
*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*