स्वामी विवेकानंद यांच्या विचारांप्रमाणे लोकाभिमुख प्रशासकीय अधिकारी घडावे-संदिप ताराम,पोलीस उपनिरीक्षक
जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे
वर्धा:-हिंगणघाट येथील विवेकानंद प्रशासकीय सेवा महाविद्यालय जि. वर्धा येथे 12 जानेवारी या राष्ट्रीय युवा दिनाच्या औचित्याने स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांची जयंती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वामी विवेकानंद, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ, व विद्येची आराध्य दैवत माँ सरस्वती यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व कॉलेजच्या सर्व विद्यार्थ्यांनी सरस्वती वंदना म्हणुन अभिवादन केले.द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी कु.श्रुती वाटकर हिने आपल्या सुंदर आवाजात विवेकानंदावर आधारित हृदयस्पर्शी गित सादर केले.
या वेळी पोलिस उपनिरीक्षक संदिप ताराम,विवेकानंद प्रशासकीय सेवा महाविद्यालयाचे संस्थापक तथा प्राचार्य प्रा.योगेश वानखेडे,जय जवान अकॅडमीचे संचालक सतीश तिमांडे, प्रवीण बोधाने व शिक्षक प्रतिनिधी प्रा.सौ.वर्षा आजनसरे,तसेच सर्व प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले सचिन ताराम यांनी मासाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला अभिवादन करून विद्यार्थ्यांना त्यांच्या यशप्राप्ती बद्दल व स्वामी विवेकानंद यांच्या विचारांवर आधारित एक चांगली व्यक्ती होऊन यशप्राप्ती करण्याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. व उपस्थित सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय युवा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. प्राचार्य योगेश वानखेडे यांनी अध्यक्षीय भाषण केले. व प्रवीण बोधाने यांनी सायबर गुन्ह्याला बळी न पडण्या बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथम ची विध्यार्थीनी कु. सेजल बावणे व गायत्री कातुलवार यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. हर्षिता बंडूजी सोनटक्के या विद्यार्थीनीने तर प्रथम वर्षाची विद्यार्थी करिश्मा डाखोरे व उत्कर्ष तुपे, द्वितीय वर्षाची विद्यार्थीनी कु. पूजा सातघरे,तृतीय वर्षाची विद्यार्थीनी कु.ट्रिंकल गिरी या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातुन विवेकानंद व जिजामाता यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्यात राष्ट्रीय स्तरावर प्राविण्य प्राप्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व मेडल देऊन पाहुण्यांच्या हस्ते सन्मान कऱण्यात आला.कु. सेजल बावणे या विद्यार्थीनीने आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाचा शेवट केला. याप्रमाणे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विवेकानंद प्रशासकीय सेवा महाविद्यालय हिंगणघाट येथे राष्ट्रीय युवा दिन मोठ्या गुण्यागोविंदाने साजरा करण्यात आला.