जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण
मो.9665175674
(भंडारा)- आसगाव येथे समता सैनिक दलाच्या 3 ऱ्या वर्धापन दिनानिमित्त बौद्ध विहार येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उपस्थित समता सैनिक दलाच्या सैनिकांना मार्गदर्शन करतांना भारतीय लोकशाही ही जगाला हेवा वाटणारी लोकशाही आहे असे प्रतिपादन समता सैनिक दलाचे लाखांदूर तालुका प्रमुख रोशन फुले यांनी केले.
ते पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्माण करतांना राणीच्या पोटातून जन्मास येणाऱ्या राज्याची
परंपरा संपुष्टात आणून लोकांनी आपला प्रतिनिधी निवडूण राजा बनवण्याची तरतूद राज्यघटनेत केली व लोकांनी लोकांकडून लोकांसाठी चालवायचे राज्य तयार करणारी राज्यघटना भारताला दिली त्यामूळे जगाला हेवा वाटावा अशी लोकशाही भारताची आहे.अशी ही सुंदर लोकशाही टिकविण्याचे काम आपल्याला करायचे आहे.समता बंधुता जर टिकवायची असेल तर लोकशाही टिकली पाहिजे. स्वातंत्र, न्याय, स्वाभिमान, आबादित ठेवण्यासाठी समता सैनिक दलाच्या शाखा प्रत्येक गावात तयार झाले पाहिजे असे मत सुद्धा त्यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाला अध्यक्ष संगीता बोरकर जी.प.सदस्य,उदघाटक आर.सी फुल्लुके, प्रमुख पाहुणे जयपाल टेंभुर्णे तालुका प्रमुख पवनी, शेखर पडोळे पं.स.सदस्य आसगाव, चंद्रशेखर खोब्रागडे भंडारा, स्वप्नील गणवीर,गुनप्रिया वानखेडे बाचेवाडी,गीता घुटके वलनी,रेखा धनविजय सरांडी, रेखा मेंढे भेंडाळा यांनी सुद्धा समता सैनिक दलाच्या सैनिकांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सावित्रीताई बोरकर यांनी केले . संचालन शितल रामटेके यांनी केले.सोमनाला, वलनी, बाचेवाडी तसेच परिसरातील शाखेचे सैनिक हजर होते. सदर कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता महेश गजभिये, ईश्वर आकरे, सुरेश फुले व आसगाव शाखेतील समता सैनिक दलाच्या सर्व सैनिकांनी अथक परिश्रम घेतले.