जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे
यवतमाळ:-राळेगाव तालुक्यातील धानोरा येथील नागरिक विविध मागण्यासाठी दि. 26 जानेवारीला शुक्रवारपासुन ठिक 11 वाजेपासून आमरण उपोषणाला बसले आहे, राळेगाव तालुक्यातील धानोरा येथील वार्ड क्र 3 मधील गोर गरीब अनेक दिवसांपासून रहिवासी असलेल्या लोकांना पट्टे देण्यात यावे तसेच, धानोरा येथील गोर गरीब, भूमिहीन, अतिगरजाऊ,ओ. बी. सी. लोकांना मोदी आवास योजनेचा लाभ देण्यात यावा, धानोरा येथे 58 ओ. बी.सी लोकांना मोदी आवास योजनेच्या लाभ मिळणार आहे मात्र या यादी मध्ये अनेक शेतकरी,अनेकाचे सदन असलेल्या घराना, समाविष्ट करण्यात आल्यामुळे अनेक गोर गरीब जनता घरकुलापासुन वचिंत राहत आहे, धानोरा येथे गेल्या तीन वर्षांपासून आमसभा सुद्धा घेतल्या गेली नसल्याचे सांगितले आहे.
त्याच प्रमाणे धानोरा येथे अनेक वर्षांपासून वार्ड क्रमांक तीन मध्ये रहिवासी असलेल्या लोकांना पट्टे सुध्या देण्यात यावे कारण पट्टे नसल्यामुळे हे लोक योजनेपासून वचिंत राहत आहेत याकरिता आम्ही उपोषणाला बसलो आहे असे उपोषणकर्त प्रमोद रमेश ढाले, मारोती बोरकर,गजानन देविदास सुरकर,अरूण आत्राम, सुधीर हटवार, राजु मेश्राम, यांनी म्हटले आहे,हे सर्व दि 26 जानेवारी पासून आमरण उपोषणाला बसले आहे, शासन या लोकांना न्याय देणार का धानोरा येथील वाड क्र ३ मधील जनतेला पट्टे मिळणार का❓ ओ. बी. सी. गोर गरीब, भूमिहीन जनतेला मोदी आवास योजनेंतर्गत लाभ मिळणार का❓ हे सर्व प्रश्न जनतेला पडले आहे.