Breaking News

गुन्हे अन्वेषण विभाग एलसीबी चा दनका मोडला रोड रॉबरी करणाऱ्या आरोपींचा मणका

एल. सी. बी. गुन्हे अन्वेषण विभाग
अहमदनगरचे प्रमुख दिनेश आहेर आणि त्यांच्या सहकाऱ्यांची दबंग कारवाई सुमारे अकरा लाख रुपयांची चोरी करणारी आरोपी केले जेरबंद

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755

शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की गुप्त खबर्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार अहमदनगर गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख दिनेश आहेर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शेवगाव शहरातील तीन महिन्यापूर्वी झालेल्या रोड रॉबरी मधील संशयित आरोपींना केले वरुर बु. येथून जेरबंद या बाबत ची हकीकत अशी की फिर्यादी विठ्ठल लक्ष्मण सोनवणे वय 45 हे दिनांक 28 डिसेंबर 2023 रोजी नोकरीस असलेल्या तिरुपती कॉटन अँड जिनिंग चा चेक घेऊन बँक ऑफ बडोदा मध्ये पैसे काढण्यासाठी गेले असता रक्कम घेऊन परत येत असताना त्यांचा पाठलाग करून विना क्रमांकाच्या काळ्या रंगाच्या मोटारसायकल वरून दोन इसमांनी त्यांचा पाठलाग केला मोटरसायकल लाथ मारून खाली पाडले व तलवारीचा धाक दाखवून नमूद केलेली रक्कम घेऊन पसार झाले.

यासंदर्भात शेवगा पोलीस स्टेशनला गुन्हा रजि. नं. 1206/2023 भा.दं.वि. कलम 394 व 34 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता हा गुन्हा घडल्यानंतर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब यांनी गुन्हे अन्वेषण विभागाचे दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली पथक नेमले होते. गुप्त खोबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी शेवगा पोलीस स्टेशनच्या नियुक्तीस असलेले धाकतोडे आणि गुंजाळ या कर्मचाऱ्यांच्या व पांचांच्या समक्ष पुढील कारवाईच्या आदेश देऊन पथक रवाना करण्यात आले वरुर बुद्रुक येथील आरोपी चेतन प्रमोद तुज़ारे वय 19 व समाधान विठ्ठल तुज़ारे वय 20 राहणार वरुर बुद्रुक याला राहत्या घरातून ताब्यात घेऊन अधिक चौकशीसाठी शेवगाव पोलीस स्टेशन येथे आणले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली त्याचे दोन सहकारी समाधान विठ्ठल तुज़ारे वय 20 व संशयित फरार आरोपी अर्जुन उर्फ बाळू तुजारे यांची नावे सांगितली गुन्ह्यासाठी वापरलेले वाहन व चोरीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला फरार आरोपीचा शोध शेवगाव पोलीस घेत आहेत रोडरोबरी चा शोध लागल्याने एलसीबीच्या पथकाचे शेवगाव तालुक्यात अभिनंदन होत आहे.

*ताजा कलम*

*शेवगाव बस स्थानक परिसरात गेल्या अनेक दिवसापासून चेंज मॅचिंग चे प्रकार झालेले असून तेथील सीसीटीव्ही फुटेज मध्ये संबंधित आरोपी कैद झालेले असताना सुद्धा गेले कित्येक महिने त्याचा तपास न लागल्याने अहमदनगरचा गुन्हे अन्वेषण विभाग निश्चित यातील या आरोपींना पकडील अशी अपेक्षा शेवगावकरांना आहे*

*क्रमशः*

*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

अशैक्षणिक आणि ऑनलाईन कामाने शिक्षक त्रस्त : सुरेश डांगे

सेवानिवृत्तीनिमित्त रावन शेरकुरे आणि प्रमोद मायकुरकर यांचा शिक्षक भारतीतर्फे सत्कार जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-भावी पिढी …

मातृतिर्थ सिंदखेड राजा को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. च्या शेकडो गुंतवणूकदारांना आधी मी कमवीन मग तुमचे पैसे फेडील

मातृ तीर्थ सिंदखेडराजा को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड ज्या त्या मुख्य संचालकाचे सोशल मीडियावर गुंतवणूक दारांना थांबा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved