Breaking News

देशहितासाठी गुणवत्तापूर्वक संशोधन व्हावे – डॉ.अनिल झेड चिताडे

ग्रामगीता महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्र; जीवशास्त्रातील आधुनिक प्रवाहाबाबत विचारमंथन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर:-भारतामध्ये दरवर्षी पाच लाखापेक्षा जास्त संशोधन पेपर प्रकाशित होत असून त्यातून चाळीस ते पंचेचाळीस टक्केच संशोधन हे समाज उपयोगी ठरत आहे. आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातही भारताला नव्वद टक्के तंत्रज्ञान परकीय देशातून अवगत करावे लागते त्यामुळे संशोधकांनी आपले संशोधन गुणवत्तापूर्ण कसे होईल यावर भर दिला पाहिजे असे आवाहन डॉ. अनिल झेड. चिताडे, अधिष्ठाता, विज्ञान व तंत्रज्ञान शाखा गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांनी केले. ग्रामगीता महाविद्यालय चिमूर येथे “जीवशास्त्रातील आधुनिक प्रवाह”या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र घेण्यात आले त्यावेळी डॉ. चिताडे उदघाटक म्हणून बोलत होते.

या राष्ट्रीय चर्चासत्रास इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, नागपूरचे माजी संचालक माननीय डॉ.मोहन गाडेगोने हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते त्यांनी संवाद साधत असतांना, विशेषतः गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील संशोधकांना पुरेसे संशोधन साहित्य व प्रयोगशाळा उपलब्ध नसल्यामुळे त्यांच्या गुणवत्तापूर्ण संशोधनात बाधा येत आहेत. परंतु संशोधकांनी नकारात्मक विचार न करता उपलब्ध संसाधनात आपले संशोधन प्रामाणिकपणे व गुणवत्तापूर्ण पूर्ण करावे असे मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे माजी कुलगुरू डॉ. किर्तीवर्धन दीक्षित यांनी आपले अध्यक्षीय विवेचन करीत असतांना नव संशोधकांनी नवनिर्माण करण्यासाठी नाविन्यपूर्ण संशोधन करणे आवश्यक असून त्यामुळेच समाज उन्नती होईल आणि संशोधकाचा दर्जा सुद्धा वाढेल असे मत व्यक्त केले. या उदघाटनीय समारोहाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. अमीर ए. धमानी यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. विवेक माणिक आणि आभारप्रदर्शन डॉ. युवराज बोधे यांनी केले.

या चर्चासत्रामध्ये एकूण दोन तांत्रिक सत्र घेण्यात आले. पहिले सत्र हे डॉ. जी. डी. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली व डॉ. सचिन मीसार प्रमुख यांच्या उपस्थितीत डॉ. रुपेश एस. बडेरे यांनी ‘अप्लिकेशन ऑफ ऑरगॅनिक अल्टरनेटिव्ह फॉर डिसीज मॅनेजमेंट इन क्राँप्स’या विषयावर घेतले. त्यामध्ये त्यांनी जैविक व सेंद्रिय पर्यायांचा वापर केल्याने पिकांची प्रतिरोध क्षमता नैसर्गिकरित्या वाढते असे मत आपल्या सदरीकारणात मांडले. तर दुसरे तांत्रिक सत्र ‘ आर्ट ऑफ वाईल्डलाईफ फोटोग्राफी’ या विषयावर आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध फोटोग्राफर मा. वरून ठक्कर यांनी घेतले यादरम्यान त्यांनी भारतभरातील व भारताबाहेरील वन्य प्राण्यांचे विविध असामान्य फोटोग्राप्स सादर करून त्यांच्या वाईल्डलाईफ फोटोग्राफीची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात येऊन, वन्यजीव प्राण्यांच्या संवर्धनासाठी समस्या आणि उपाय यावर चर्चा केली.

या राष्ट्रीय चर्चासत्राच्या अनुसंघाने नागपूरचे डॉ. अँड्र्यू, डॉ. बारसागडे, अमरावतीचे डॉ. माणिक, नवरगावचे डॉ. बाकरे ,डॉ. कोरपेनवार, डॉ. मृणाल काळे, डॉ. पी.एस. झाकी, डॉ. एम. सुभाष, डॉ. ए. पी. सव्हाने, डॉ. एस. सी. मसराम, डॉ. प्रफुल्ल काटकर, डॉ. प्रवीण तेलखेंडे, डॉ. वेगीनवार या मान्यवरांचा त्यांच्या अध्यापन व संसोधकिय कार्यासाठी शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
या राष्ट्रीय चर्चासत्रासाठी देशभरातून विविध महाविद्यालयातील जवळपास १३० पेक्षा सहभागिनी नोंदणी केली असून राष्ट्रीय चर्चासत्राच्या निमित्ताने वेगवेगळ्या विषयावर ६० हून अधिक शोध निबंधाचे सार प्रकाशित करण्यात आले तसेच पोस्टर स्पर्धा घेण्यात आली. समारोपीय कार्यक्रम प्राचार्य डॉ. अमीर ए. धमानी यांच्या अध्येक्षेतेखाली घेण्यात आले त्यावेळी मंचावर डॉ. अँड्र्यू, डॉ. बारसागडे, डॉ. प्रवीण तेलखेंडे उपस्थित होते. समारोपीय कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. निलेश ठवकर, सूत्रसंचालन डॉ. वरदा खटी तर आभारप्रदर्शन डॉ. मृणाल वऱ्हाडे यांनी केले. या चर्चासत्राच्या यशस्वीतेसाठी डॉ. संदिप सातव, प्रा. संदिप मेश्राम, प्रा. हुमेश्वर आनंदे, प्रा. शिल प्रा. रोहित चांदेकर आणि सर्व प्राध्यापकवृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

त्या दोन लीडरला गुंतवणूकदारांनी दिला चौप

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की सध्या वादात असलेल्या कोट्यावधी रुपयांच्या …

युवकाचे प्रेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली

*तालुक्यातील हातगाव येथील नागेश बंडू गलांडे वय २४ रा हातगाव हा गायब झालेल्या युवकाचे प्रेत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved