Breaking News

शेवगाव बस स्थानकाची दुरावस्था नवनिर्माण दिन बांधकामाचा राडाराडा आणि काही खाजगी वाहनांची अडचण प्रवाशांचे हाल

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755

शेवगाव:- शेवगाव मधील बस स्थानकावर प्रवासांना होणारी अडचण नेमकी कधी दूर होणार आणी कोण करणार ??? असा प्रश्न सर्वसामान्य प्रवाशांना पडला आहे शेवगाव मधील बस स्टॅण्ड येथे चुकीच्या पद्धतीने बसस्थानकात लागणाऱ्या अवैध रिक्षा तसेच खाजगी चार चाकी व मोटर सायकल यांचा विनाकारण प्रवाशांना व शाळकरी विद्यार्थ्याना आबाल वृद्ध महिला व बालक यांना त्रास होत आहे या कडे शेवगाव एस. टी.डेपोच्या प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे बस स्टॉप वर दिवस रात्र पाकीट मारी चेंज मॅचिंग व छेडछाडीचे प्रकार यांचं मोठ प्रमाण वाढल आहे नवीन बस स्थानकाचा राडा रोडा सगळीकडे पसरला आहे.

शेवगाव आगाराला पूर्णवेळ डेपो मॅनेजर नाही बस कायम ना दुरुस्त असतात पूर्ण क्षमतेने फेऱ्या होत नाहीत बस स्थानकाचा कारभार मराठवाड्यातील बाहेरून येणाऱ्या बसेस व शेजारच्या तालुक्यातील टाइमिंग बसेस वर अवलंबून आहे एकेकाळी उत्पन्नाच्या बाबतीत व बस फेऱ्यांच्या बाबतीत शेवगाव आगार जिल्ह्यात अव्वल स्थानी होते पूर्वी एक कर्मचारी हातात माईक घेऊन खाजगी वाहन व रिक्षा चालकांना बाहेर हाकलत असे परंतु अलीकडे तसं काही होताना दिसत नाही आता हे कुठे तरी थांबलं पाहिजे शेवगाव प्रवासी संघटना अस्तित्वात नाही अनेक लांब पाल्याच्या फेऱ्या टाइमिंग पुणे गाड्या रद्द केल्या आहेत त्याचा भुर्दंड प्रवाशांना सहन करावा लागत आहे.

*ताजा कलम*

डिसेंबर 2018 पासून शेवगाव शहराच्या नवीन बस स्थानकाचे काम गेली सहा वर्ष रखडले आहे संबंधित ठेकेदार डेपो मॅनेजर विभागीय परिवहन अधिकारी आणि मुंबईचे मुख्य कार्यालय पत्र पत्र खेळत आहे

*क्रमशः*

*नवीन बस स्थानकाला आठ ते दहा फूट उंची दिल्याने भविष्यात प्रवाशांना शिड्या लावून खाली उतरावे लागते की काय अशी परिस्थिती आहे*

*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

खळबळ शहर टाकळी मध्ये लक्ष्मी देवीच्या यात्रेत मर्डर

शेवगाव तालुक्यातील शहर टाकळी येथे लक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त छबिना मिरवणुकीत जुन्या वादातून एकास मारहाण शेवगावच्या …

अनोळखी मृतकाची ओळख पटविण्याकरीता संपर्क करण्याचे आवाहन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 2 : दिनांक 31 मार्च 2024 रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved