Breaking News

अनोळखी इसमाचा दगडाने ठेचून केला खून

जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ

यवतमाळ:-राळेगाव शहरात अनोळखी इसमाचा दगडाने ठेचून खून केल्याचे आढळले असून हा प्रकार शासकीय निवास स्थाना च्या मागे घडला आहे. या खुनामागे कोण आणि कशामुळे झाला याचा संपूर्ण तपास सुरु असून दोन दिवसा आधी या अनोळखी इसमाला मोठ्या प्रमाणात दारू विक्री करताना बसस्टॅण्ड परिसरात बघितल्याची चर्चा होत असून चायनीज सेंटर सुद्धा चालवीत होत असल्याची चर्चा नागरिकात होत आहे. हा खून दारू विक्रीतूनच झाल्याचा संशय होत असल्याची परिसरात खळबळ उडत असून राळेगाव शहरात हल्ली दारू गुत्त्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून यांची दादागिरी सुद्धा वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. यांना परवाना कोण देत असते हा सुद्धा प्रश्न नागरिकांना पडत असून यांच्या कडून हप्ते बांधून दारू विक्रीस परवानगी भेटत असल्याची चर्चा शहरात जोरात सुरु आहे.

अवैध धंद्याचे प्रमाण वाढत असून पोलीस प्रशासन यावर कुठलीच कठोर कारवाई करताना दिसत नसून आर्थिक सहाय्य तर होत नाहीना असा प्रश्न सामान्य नागरिकांना उपस्थित होताना दिसत आहे. मध्यवर्ती बँक ते बसस्टॅन्ड लाईन च्या हॉस्टेल च्या बाजूला असलेल्या अतिक्रमण मध्ये हे दारू चे दुकाने असून छुप्या पद्धतीने दारू विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याचे बोलले जात आहे. शहरात दारू विक्री जोरात सुरु असून शिवाजी पुतळा चौक,भूमिअभिलेख कार्यालय,गर्ल्स हॉस्टेल, बिरसा मुंडा चौक, ट्रॅव्हल्स पॉईंट, आठवडी बाजार इत्यादी ठिकाणी मोठ्या प्रमाणात छुप्या पद्धतीने हि दुकाने सुरु असून सामान्य जनतेच्या नजरेत येत असून पोलीस प्रशासनाच्या नजरेत का बर येत नाही ?? कि आर्थिक लाभ घेऊन आम्हाला हि दुकाने माहीतच नसल्याचे चित्र दाखवून शहरवासीयांची दिशाभूल तर करीत नाहीना. कि जो पर्यंत तक्रार येत नाही तोपर्यंत कारवाई पण होत नसेल कि तक्रादाराची वाट बघत असेल अशे अनेक प्रश्न जनतेच्या मनात उद्भवत असल्याचे समजले जात आहे. अवैध धंद्यापायी नागरिक व या परिसरातिल दुकानामालक त्रासले असून यावर कारवाई करून बंद नं केल्यास पोलीस अधीक्षक कडे लेखी तक्रार देऊ असा इशारा येथील परिसरातील नागरिकांन कडून देन्यात आला असून अवैध धंद्यावर राळेगाव पोलीस कोणती कारवाई करेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

संस्कार शिबिरातून आदर्श नागरिक घडतात – माजी सभापती नरेंद्र झंझाळ

टवेपार येथील संस्कार शिबीराचा समारोप जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- पूर्वी उन्हाळ्याच्या सुट्टीत मामांच्या गावात …

स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

अवैधरित्या रेती वाहतूक करतांना तिन ट्रॅक्टर जप्त जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : – दिनांक. २८/०४/२०२४ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved