Breaking News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट चे शेवगाव तालुका अध्यक्षपदी हरीश उर्फ टायगर शामसुंदर भारदे यांची निवड शेवगाव शहरासह तालुक्यात अभिनंदनचा वर्षाव

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755

शेवगाव :-याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव शहरातील सामाजिक कार्यकर्तभारदे साक्षरता प्रशासक मंडळाचे सर्वेसर्वा शेवगाव शहरातील तिसऱ्या आघाडीचे खंबीर नेतृत्व भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा गट यांना सारख्या अंतरावर ठेवणारे पूर्वाश्रमीचे घुले गटाचे समर्थक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दोन शकले झाल्यानंतर शेवगाव तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये तालुक्यातील वजनदार नेते नेमकी कोणत्या गटामध्ये आहेत याची कुजबूज सुरू असताना हरीश शामसुंदर भारदे यांची शेवगाव तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याने अनेक राजकीय विचारवंत मुत्सद्दी राजकारणी यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निलेश लंके यांची अहमदनगर दक्षिणचे उमेदवार म्हणून शरद पवार गटाकडून झालेली घोषणा आमदारकीचे भावी उमेदवार म्हणून प्रताप काका ढाकणे यांची झालेली घोषणा या पार्श्वभूमीवर शेवगाव शहरांमध्ये शहराच्या राजकारणात आपले वेगळे अस्तित्व टिकवून ठेवणारे भारदे काझी आणि डाके यांनी राष्ट्रवादीचा झेंडा खांद्यावर घेतल्यामुळे होऊ घातलेल्या लोकसभा विधानसभा स्थानिक स्वराज्य संस्था पं.स.व जि.प.शेवगाव शहराची नगरपरिषद या सर्व निवडणुकांवर दुर्गा मी परिवार परिणाम दिसतील शरदचंद्र पवार गटाने हेरून तालुकाध्यक्ष केल्याने गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले अनेक भावी नगराध्यक्ष आणि भावी नगरसेवक यांच्या बुरुजाला मोठे खिंडार पडले आहे असे सकृत दर्शनी दिसत आहे.

*ताजा कलम*

शेवगाव तालुक्याच्या राजकारणामध्ये माजी आमदार घुले बंधू यांनी आपली भूमिका स्पष्ट न केल्यामुळे व शरद पवार गटाकडून तिसरेच नाव तालुका अध्यक्ष ला आल्यामुळे आता तालुक्यात विविध राजकीय चर्चांना उधान येणार आहे घुले गट चोरून पुरणपोळी खाण्याचचा प्रयत्न आहेत पण कार्यकर्ते बोंबलून गुळवणी मागत आहेत. हरीश भारदे यांची अनेक राजकीय पक्षांमध्ये मित्रत्वाचे संबंध असल्यामुळे ते शरद पवार गटाची नेमकी किती बेरीज करणार हे काळच ठरवेल???

*विशेष बाब*

लोकसभा आणि विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शेवगाव शहरात आणि तालुक्यात अनेक राजकीय उलथा पालखी होणार आहेत ही तर सुरुवात आहे आगे आगे देखिये होता है क्या!!!!

*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता पत्रकार*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

ऐन उन्हाळ्यामध्ये शहरातील वीज ग्राहकांना महावितरण चा झटका

महावितरण मुंबई च्या भरारी पथकाची धडक कारवाई अनेकांची वीजचोरी पकडली मुंबईच्या भरारी पथकाने पकडले अनेक …

तिन महिन्यातच रस्ता उखरला- निकृष्ट दर्जाचे काम

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-प्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्याशी असलेला मौजा कोलारा तु हे पर्यटण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved