Breaking News

छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्र मंडळ आणि हनुमान गणेश मित्रमंडळ आयोजित श्रीकृष्ण जन्माष्टमी

गोपाळकाल्याच्या निमित्त आयोजित भव्य दहीहंडी फोडण्याचा मान “राजे संभाजी महाराज” मित्र मंडळ पैठण यांनी पटकावला

अविनाश देशमुख शेवगांव 9960051755

शेवगाव :- याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव शहरातील महात्मा सार्वजनिक वाचनालया समोरील मैदानात छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्र मंडळ आणि हनुमान गणेश मित्रमंडळ आयोजित श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाल्या च्या निमित्ताने आयोजित भव्य दहीहंडी चा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी सुमारे आठ गोविंदा मंडळांनी सहभाग घेतला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जगदीश धूत, डॉ. कृष्ण देहाडराय बंडूशेठ रासने, विद्याताई गाडेकर,घुले तात्या, दिलीप सुपारे यांच्या हस्ते नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला.
सुरुवातीला ४० फूट उंची आणि ५१ हजार रुपये बक्षीस त्यानंतर प्रत्येक सहभागी मंडळाला दोन-दोन चान्स देण्यात आले परंतु क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारा ऐतिहासिक अशा या दहीहंडी कार्यक्रमाला शेवगावकर यांनी आणि गोपाल कृष्ण भक्तांनी तोबा गर्दी केली होती.

अनेक वर्षांची परंपरा असलेल्या मध्यंतरी परंपरा खंडित झालेल्या दहीहंडीचे आयोजन केल्याने गोपाळ भक्त खुश झाले. यावेळी दहीहंडी मध्ये जय भगवान मित्र मंडळ ढाकणे वस्ती, शहीद भगतसिंग मित्र मंडळ खालची वेस, हमाल रिक्षा संघटना शेवगाव, निलेश लंके प्रतिष्ठान ग्रुप शेवगाव, इंदिरानगर मित्र मंडळ शेवगाव, स्वामी विवेकानंद मित्र मंडळ शेवगाव,राजे संभाजी मित्र मंडळ पैठण, वडार समाज मित्र मंडळ शेवगाव या संघांनी भाग घेतला. सर्व संघाने अतिशय छान कामगिरी केली प्रत्येक संघाच्या गोविंदाचा समन्वय अतिशय सुंदर होता.

यावेळी दहीहंडी फुटल्यानंतर विजयी संघाला रोख स्वरूपात ५१००० /- रुपये व सन्मानचिन्ह देण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. निरज लांडे पा., सुनील उर्फ बंडुसेठ रासणे, नवनाथ कवडे, प्रा.नितीन मालानी सर, मच्छिंद्र बर्वे, सुरज लांडे पा., गणेश शहाणे, दत्तात्रय फुंदे, सुरेश लांडे खंडूभाऊ बुलबुले, हरीश शिंदे,दिलीप सुपारे, जगदीश मानधने, अमोल माने,राजेंद्र तरटे,अमोल घोलप, आदींनी परिश्रम घेतले. या वेळी जगदीशशेठ धूत, डॉ. कृष्णा देहाडराय, सा.बा.विभागाचे मान. घुले साहेब, माऊली निमसे, सतिष लांडे विद्याताई गाडेकर,,संदीप लांडे विष्णू घनवट, ओमप्रकाश धूत, बंडूभऊ लोहे, नंदूभाऊ मुंढे, भगवान शेठ धूत, इत्यादी मान्यवर उपस्थित होते,या कार्यक्रमाचा आनंद आबालवृद्ध बालगोपाळ यांनी घेतला भविष्यात याच्या पेक्षाही मोठी सुंदर दहीहंडीचे आयोजन होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

*ताजा कलम*

दोन-तीन वर्षांपूर्वी झालेल्या वातावरणामुळे शेवगाव शहरातील सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांना बाधा पोचली होती.परंतु पूर्वीसारखे सर्व कार्यक्रम गुण्यागोविंदाने साजरे करण्याची शेवगावकर यांची पिढ्यानपिढ्या ची ही परंपरा जपत या आयोजक तरुणांनी शेवगाव करण समोरे एक आदर्श ठेवला आहे. शेवगाव पोलीस स्टेशनच्या कर्मचारी श्री बाप्पासाहेब धाकतोडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शेवगांव पोलीस स्टेशन चे नवनियुक्त पि. आय. समाधान नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवला होता

*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

ईद-ए-मिलाद निमित्त 16 सप्टेंबर रोजी सुट्टी

विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर , दि. १४ – राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या 24 सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये ईद-ए-मिलाद …

मयत मच्छिंद्र तुकाराम ससाणे यांचे मारेकरी आणि पाथर्डी व शेवगाव परिसरात धुमाकुळ घालणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद

अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :- या बाबत सविस्तर वृत्त असे की पकडलेल्या टोळीकडून तिसगाव, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved