Breaking News

शिक्षकांच्या प्रश्नांना वाचा फोडणारी एकमेव संघटना शिक्षक भारती : डॉ. अशोक कापगते

शिक्षक भारती नागपूर विभागीय सहविचार सभा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर :- शिक्षक भारती (प्राथमिक, माध्यमिक) नागपूर विभागाची सहविचार सभा नागपूर येथे नवप्रतिभा महाविद्यालयात शिक्षक भारतीचे विभागीय उपाध्यक्ष डॉ. अशोक कापगते यांचे अध्यक्षतेत संपन्न झाली. याप्रसंगी राज्य उपाध्यक्ष राजेंद्र झाडे,विभागीय अध्यक्ष भाऊराव पत्रे,प्राथमिक विभागीय अध्यक्ष सुरेश डांगे,राज्य संघटक सचिव किशोर वरभे,महिला आघाडी अध्यक्षा स्वाती हिरवडे, नागपूर जिल्हाध्यक्ष भारत रेहपाडे,चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम टोंगे,भंडारा जिल्हाध्यक्ष उमेश सिंगनजुडे,वर्धा जिल्हा कार्याध्यक्ष हरिहर झाडे,नागपूर शहराध्यक्ष विलास गभणे, प्राथमिकचे विभागीय सरचिटणीस शरद काकडे,उपाध्यक्ष राजू भिवगडे, संघटक रवींद्र रोहनकर,नागपूर जिल्हाध्यक्ष प्रवीण फाळके,गडचिरोली जिल्हाध्यक्ष पुंडलिक देशमुख आदी उपस्थित होते.

शिक्षक भारती संघटना कपिल पाटील यांचे माध्यमातून शिक्षकांचे अनेक प्रश्न सातत्याने सोडवत आली आहे. शिक्षणाच्या हक्कासाठी शिक्षक भारती सदैव लढत आहे.विधानपरिषदेत गेली अठरा वर्षे कपिल पाटील शिक्षकांसाठी सरकारसोबत संघर्ष करीत राहिले. शिक्षकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम कपिल पाटील यांनी केले. ते आता सभागृहात नसले तरी शिक्षकांचे प्रश्न, शिक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी ते पाठपुरावा करीत आहेत. शिक्षक भारती पदाधिकाऱ्यांनी शिक्षकांचे प्रश्न प्रामुख्याने सोडविण्यासाठी प्रयत्न करावे असे प्रतिपादन डॉ. अशोक कापगते यांनी केले. राज्य उपाध्यक्ष राजेंद्र झाडे, भाऊराव पत्रे, स्वाती हिरवडे, किशोर वरभे, जिल्हाध्यक्ष उमेश सिंगनजुडे,पुरुषोत्तम टोंगे, भारत रेहपाडे,प्रवीण फाळके,पुंडलिक देशमुख, विलास गभणे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

सहविचार सभेत शिक्षकांच्या विविध समस्यांवर,विषयांवर चर्चा झाली.राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत झालेल्या निर्णयांवर चर्चा करण्यात आली.संघटना मजबुतीसाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे,शिक्षकांच्या प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नरत राहणे आवश्यक असल्याच्या भावना उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केल्या.जिल्हा पदाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यातील समस्या याप्रसंगी कथन केल्या.

सहविचार सभेत किशोर वरभे आणि पुंडलिक देशमुख यांना जन्मदिनानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.शरद काकडे यांच्या शाळेला आयएसओ मानांकन प्राप्त झाल्याबद्दल पुस्तक देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.सहविचार सभेचे संचालन सुरेश डांगे यांनी केले. आभारप्रदर्शन नागपूर जिल्हा कार्यवाह दीपक नागपुरे यांनी केले. सहविचार सभेला नागपूर विभागातील शिक्षक भारती पदाधिकारी उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

ईद-ए-मिलाद निमित्त 16 सप्टेंबर रोजी सुट्टी

विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर , दि. १४ – राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या 24 सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये ईद-ए-मिलाद …

मयत मच्छिंद्र तुकाराम ससाणे यांचे मारेकरी आणि पाथर्डी व शेवगाव परिसरात धुमाकुळ घालणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद

अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :- या बाबत सविस्तर वृत्त असे की पकडलेल्या टोळीकडून तिसगाव, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved