Breaking News

222 शेवगाव – पाथर्डी विधानसभा मतदार संघाची मतदार यादी जाहीरएकूण मतदार तीन लाख अदुसष्ठ हजार सातशे त्रेचाळीस एकूण मतदार

अविनाश देशमुख शेवगांव 9960051755

शेवगाव :- या बाबत सविस्तर वृत्त असे की 222 शेवगाव- पाथर्डी विधानसभा मतदार संघाची अंतिम मतदार यादी नुकतीच जाहीर करण्यात आली असून, त्यात १ लाख ९२ हजार ४४७ पुरुष तर १ लाख ७६ हजार २९० महिला व इतर सहा, अशा एकूण ३ लाख ६८ हजार ७४३ मतदारांचा समावेश असल्याची माहिती प्रांताधिकारी प्रसाद मते व शेवगावचे तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी दिली.या अगोदरही दि.५ जुलै रोजी मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली होती, त्यात ३ लाख ६२ हजार ७०४ मतदारांचा समावेश करण्यात आला होता; परंतु निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पुर्ननिरीक्षण मोहीम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेत विधानसभा मतदारसंघात मतदारांच्या संख्येत ६ हजार १९२ ने वाढ झाली असून १ हजार ७८२ मतदार कमी झाल्याची माहिती प्रांताधिकारी मते यांनी दिली.

शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील महसूल विभागातील विशेषतः निवडणूक शाखेतील अधिकारी कर्मचारी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या एकत्रित सामूहिक प्रयत्नातून शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील मतदारांची संख्या जिल्ह्यातील अन्य तालुक्यांतील मतदारांच्या संख्येपेक्षा सर्वाधिक असल्याचे ते म्हणाले. शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात शेवगाव तालुक्यातील शेवगाव नगरपरिषदेसह एकूण ११३ गावांचा तर पाथर्डी तालुक्यातील पाथर्डी नगरपरिषदेसह १०१ गावांचा समावेश असून, शेवगाव तालुक्यातील मतदान केंद्राची संख्या १९९ तर पाथर्डी तालुक्यातील मतदान केंद्राची संख्या १६९ असल्याचेही मते व सांगडे यांनी सांगितले. शेवगावचे निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार राजेंद्र बकरे महसूल सहाय्यक सुरेश बर्डे हे या वेळी उपस्थित होते. १८ वर्षे वय पूर्ण झालेल्या मतदारांची मतदार नोंदणी प्रक्रिया कायम सुरू असून, शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील १८ वर्षे वय पूर्ण झालेल्या नवोदित युवक- युवतींनी आपली मतदार नोंदणी करून आपले नाव मतदार यादीत समाविष्ट झाल्याची खात्री करून घेण्याचे आवाहन निवडणूक शाखा नायब तहसीलदार बकरे यांनी केले आहे.

*ताजा कलम*

*क्षेत्रफळाने आणि लोकसंख्येने सर्वात मोठा असलेला शेवगाव पाथर्डी मतदार संघ भौगोलिक आणि नैसर्गिक आव्हानांचा सामना करत असलेला मतदारसंघातून एकीकडे सधन असा धरण पट्टा आहे तर दुसरीकडे डोंगराळ आणि जिरायती क्षेत्र आहे पूर्व भागात शेतीच्या पाण्याचा प्रश्न आहे त पश्चिम भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे जय युवकांचे वय वर्ष 18 पूर्ण झालेले आहे त्यांची नाव मतदान नोंदणी मात्र सुरूच राहणार आहे मतदारसंघात मूलभूत प्रश्नांभोवतीच इलेक्शन होणार असुन मतदार राजा कोणाला कौल देतो हेच येत्या काही दिवसांत चित्र स्पष्ट होईल*

*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता पत्रकार*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

ईद-ए-मिलाद निमित्त 16 सप्टेंबर रोजी सुट्टी

विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर , दि. १४ – राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या 24 सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये ईद-ए-मिलाद …

मयत मच्छिंद्र तुकाराम ससाणे यांचे मारेकरी आणि पाथर्डी व शेवगाव परिसरात धुमाकुळ घालणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद

अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :- या बाबत सविस्तर वृत्त असे की पकडलेल्या टोळीकडून तिसगाव, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved