लाखांदूर येथे बहुजन समाज पार्टीच्या संविधान जनजागृती बाईक रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण
मो.9665175674
( भंडारा )- बहुजन समाज पार्टीच्या वतीने आयोजित संविधान जनजागृती बाईक रॅलीला लाखांदूर आणि परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दि. 22 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 8 वाजता सम्यक बौद्ध विहार, लाखांदूर येथून या रॅलीची सुरुवात झाली. रॅलीत शेकडो संविधानप्रेमी नागरिक आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
रॅली लाखांदूर शहरातून विरलीपर्यंत मार्गक्रमण करत विश्वशांती बौद्ध विहार, विरली येथे संपन्न झाली. मार्गातील अनेक ठिकाणी स्थानिक नागरिकांनी रॅलीचे स्वागत केले. बाईक रॅलीत सहभागी कार्यकर्त्यांनी संविधानाच्या महत्त्वाबद्दल संदेश देत, जनजागृती केली.कार्यक्रमाची सांगता विश्वशांती बौद्ध विहार, विरली येथे झाली, जिथे संविधानाच्या मूल्यांवर विचारमंथन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी संविधान संरक्षणाचे आवाहन केले आणि बहुजन समाजाला संघटित होऊन संविधानाच्या मार्गदर्शनाखाली पुढे जाण्याचे आवाहन केले.
सदर रॅलीचे आयोजन रोशन फुले साकोली विधानसभा प्रमूख ब स पा व चेतन बोरकर तालुका अध्यक्ष ब स पा, यांच्या नेतृत्त्वात करण्यात आले, तसेच चंद्रमणी गोंडाने, अमित रामटेके, धीरज गोसावी, कार्तिक मेश्राम, पप्पू नंदेश्वर, चंद्रहास चव्हाण, सोपान दिवटे, मनीष बनसोड, प्रमोद बरसागडे, प्रणय मेश्राम, अतुल राऊत, टिकेस जनबांधू असंख्ये कार्यकर्ते उपस्थित होते, बहुजन समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आगामी काळात अशा उपक्रमांना अधिक गती देण्याचे उद्दिष्ट ठेवल्याचे सांगितले.रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले.