Breaking News

राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या मांगण्यावर सकारात्मक चर्चा

अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमुर -: राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ बबनरावजी तायवाडे ,आ.परिणय फुके, गुणेश्वर आरीकर यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांची नागपूर येथील देवगीरी निवासस्थानी भेट घेतली.विद्यार्थ्यांची मॅट्रिकपुर्व शिष्यवृत्ती, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, जुनी पेन्शन, शिक्षक केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी, उच्च श्रेणी मुख्याध्यापक, सेवानिवृत्त शिक्षक, विद्यार्थ्यांच्या समस्या व इतर समस्यावर सकारात्मक चर्चा करण्यात आली व निवेदन देण्यात आले.

यावेळी राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाचे राज्याध्यक्ष श्याम लेडे, राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाचे संजय मांगे, विभागीय अध्यक्ष राजू बोचरे, चिमूर तालुका अध्यक्ष कवडू लोहकरे, नागपूर राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाचे सल्लागार हेमराज बनसिंगे आदी ओबीसी पदाधिकारी उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

सुधीर मुनगंटीवार साठी लाडक्या बहिणी बनल्या रणरागिणी

*मविआच्या स्टंटबाजीला कोसंबीतील महिलांचे आक्रमक प्रत्युत्तर, हल्लेखोरांची पळापळ* *‘लाडकी बहीण’ हिट झाल्याने मविआचा रडीचा डाव* …

बस! मतदान करा आणि जिंका एनफिल्ड बुलेट, सोन्याचे नाणे आणि मोबाईल

मतदारांसाठी जिल्हा प्रशासनाद्वारे आकर्षक बक्षीस योजना जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 18 : लोकशाही प्रक्रियेमध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved