जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर/भिसी :- भिसी पोलीस स्टेशन येथे 112 वर प्राप्त कॉलच्या माहिती प्रमाणे ऐक बोलेरो पिकअप चारचाकी गाडीने शंकरपूर – भिसी मार्गे नागपूरकडे कत्तलीकरिता दिनांक 02 नोव्हेंबरच्या मध्यरात्री जनावरांची अवैधरित्या वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार भिसी पोलीस स्टेशनचे स.पो.नि. चांदे, पो उप.नि वाघ, HC 1084 भोयर, चालक pc मनोज असे पथक तयार करून भिसी,शंकरपूर रोडनी तात्काळ रवाना झाले असता एक बोलेरो पिकअप क्रमांक MH 40 BL 3979 ही समोरून येताना दिसली. पोलीस वाहणास पाहून गाडी चालकाने शंकरपूरच्या दिशेने गाडी पळविली . पोलीसांनी सिनेस्टाईल बोलेरो पिकअप चारचाकी गाडीचा पाठलाग केला असता चालकाने मौजा आंबोली जवळ अंधाराचा फायदा घेत गाडी रोडच्या खाली सोडून झाडा-झुडपातून पळून गेला.
पिकअप गाडीची पाहणी केली असता त्यात एकूण 04 गोवंशीय जनावरे अत्यंत निर्दयतेने पायाला दोर बांधून कोंबलेल्या अवस्थेत चारापाण्याची कुठली व्यवस्था न करता कत्तल करण्याच्या उद्देशाने चोरी करून वाहतूक करीत असताना दिसून आले.
04 गोवंशीय जनावरे एकूण किंमत 40,000/- रुपये व बोलेरो पिकअप किंमत अंदाजे 5 लाख रुपये असा एकूण 5 लाख 40 हजार रुपयाचा माल जप्त केला आहे. चालक फरार असून आरोपी बोलेरो पिकअप चालका विरुदध पो. स्टे.भिसी येथे अप. क्र. 203/24 कलम 281, 303 (2) भा.न्या.सं. सहकलम 5(e),5(b) महाराष्ट्र पशुसंवर्धन अधिनियम, सहकलम 11(1)(ड ), 11(1) (फ) प्राण्यां. छ. प्रतिबंधक अधिनियम सहकलम 83/177 महाराष्ट्र मोटर वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्हाचा पुढील तपास सुरू आहे.