विशेष प्रतिनिधी-नागपूर
नागपूर, दि. ४ – विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज दि. ४ नोव्हेंबर रोजी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी नागपूर जिल्ह्यातील एकूण १२ विधानसभा मतदारसंघातील ७२ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. निवडणूक लढविणा-या उमेदवारांची संख्या सर्व विधानसभेसाठी २१७ एवढी झाली असल्याचे निवडणूक विभागाने कळविले आहे.
*या उमेदवारांनी घेतली माघार*
*उमरेड*- रुपाली प्रमोद घरडे (अपक्ष), शशिकांत बारसु मेश्राम ( आझार समाज पार्टी), घनशाम सोमा राहाटे (अपक्ष), दर्शनी स्वानंद धवड ( अपक्ष), दिलीप सुखदेव बन्सोड ( अपक्ष), पद्माकर डोमाजी बावणे ( अपक्ष), प्रमोद रामचंद्र बावणगडे (अपक्ष), प्रशांत वासुदेवराव कांबळे ( अपक्ष), मिलिन्द इस्तारी सुटे (अपक्ष), राजू देवनाथ पारवे (अपक्ष), शशिकांत हिरामण मेश्राम (अपक्ष).
*नागपूर उत्तर*- महेंद्र तुळशीराम भांगे (अपक्ष), अनिल पांडुरंग वासनिक (अपक्ष), प्रविण पाटील (अपक्ष), रमेश श्यामरावजी वानखेडे (अपक्ष).
*नागपूर पूर्व* – कमलेश हरिचंद नागपाल (अपक्ष), तानाजी सुकलाजी वनवे (अपक्ष), सहदेव भिमराव गोसावी (अपक्ष), सागर दामोधर लोखंडे (अपक्ष), सुफियान खान (अपक्ष), संगीता महेश तलमले (अपक्ष).
*कामठी* – मनोज बाबुराव रंगारी, गणेश आनंद मुदलियार, गणेश बाबुराव पाटील, राजू रघुनाथ वैद्य, सचिन भानुदास पाटील, शौकत अली बागवान, राजेश बापुजी काकडे, दीपक सुधाकर मुळे, संविधान लोखंडे, किशोर मारोतरावर गेडाम.
*नागपूर दक्षिण* – माधुरी मोहन मते (बळीराजा पार्टी), अरुण रामभाऊ गाडे ( अपक्ष).
*नागपूर मध्य*- अशोक आनंदराव धापोडकर, इरफान अहमद गुलामुस्सिबतैन, किशोर समुंद्रे, गंगाधर नागोराव पाठराबे, दीपक उमरेडकर, दीपक देवघरे, प्रफुल बोकडे, राजेश धकाते, विनायक माधवराव पराते (पट्टीवाले). शकील अहमद, संजय रामराव हेडाऊ, हरीशचंद्र वेळेकर.
*काटोल* – सुबोध बाबुराव मोहिते (अपक्ष), राजश्री श्रीकांत जिचकार (अपक्ष), नरेश जनकराव अरसडे (अपक्ष), वृषभ गजाननराव वानखेडे (अपक्ष), संदीप यशवंतराव सरोदे (अपक्ष)
*नागपूर पश्चिम* – नरेश वामनराव बरडे (अपक्ष), राजेश जानराव गोपाळे (अपक्ष), राजेंद्र बाबुलाल तिवारी (अपक्ष),
*रामटेक* – कारामोरे रमेश प्रभाकर, शांताराम विठोबाजी जळते, हरीषभाऊ गुलाब उइके, किशोर मनोहर बेलसरे, नरेश करन धोपटे, डॅा. राजू उर्फ राजेश ठाकरे, विक्की रतीराम जिभकाटे.
*हिंगणा* – कॅाम्रेड श्याम गुलाबराव काळे, दिनेश ताराचंद बन्सोड, शिवकुमार गोवर्धन मेश्राम, प्रजय दिनकर रामटेके, सौ उज्वला पुरुषोत्तम बोढारे, राहुल धनराज सोनटक्के, महेंद्र धनजीभाई मेश्राम, नागपुरे वृंदा प्रकाश.
*नागपूर दक्षिण पश्चिम* – मारोती सीताराम वानखेडे (बहुजन रिपब्लीकन सोशॅलीस्ट पार्टी).
*सावनेर* – मुकेश सुभाष मित्तल, मेहमुद युसूफ सिद्दीकी, राजू पुंजाराम कांबे.