
नागपूर – नागपूरात 7 डिसेंबर पासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. मात्र, नागपुरातील कोरोनास्थिती गंभीर असल्यानं अधिवेशन रद्द करावं, अशी मागणी केली जातेय. अधिवेशनावर होणार खर्च आरोग्य यंत्रणेवर करावा अशी मागणी काँग्रेसच्या आमदारांनी केली आहे.
मात्र, विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी अधिवेशन होणार असं स्पष्ट केलंय. संयुक्त महाराष्ट्रात समाविष्ट होताना एक अधिवेशन विदर्भात व्हावं असा करार झालाय. त्यामुळं विदर्भात अधिवेशन न घेतल्यास विदर्भातील जनतेवर अन्याय होईल. तसंच अधिवेशन डिसेंबर महिन्यात आहे. तोपर्यंत नागपुरातील कोरोनास्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. डिसेंबर महिन्यापर्यंत कोरोनाचा प्रभाव कमी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.