
नागपूर दि.17 : नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आज उमेदवारी मागे घेण्याचे शेवटच्या दिवशी 7 उमेदवारी (नामनिर्देशन पत्र) अर्ज मागे घेण्यात आले आहे. यामध्ये संदीप जोशी (अपक्ष), धर्मेश फुसाटे (अपक्ष), गोकुलदास पांडे (अपक्ष), शिवाजी सोनसरे (अपक्ष), सचिदानंद फुलेकर (अपक्ष), प्रा. किशोर वरभे (लोकभारती) व रामराव ओमकार चव्हाण (अपक्ष) यांचा समावेश आहे.