- आतापर्यंत २०५३४ व्यक्तिं विरुध्द कारवाई
नागपूर, ता.२० : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी शुक्रवारी (२० नोव्हेंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार २२४ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे १ लक्ष १२ हजार रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही दिवसात शोध पथकांनी २०५३४ नागरिकांविरुध्द कारवाई करुन रु. ८६,२६,०००/- चा दंड वसूल केला आहे.
शुक्रवारी मनपा उपद्रव शोध पथकाव्दारे लक्ष्मीनगर झोन अंतर्गत २६, धरमपेठ झोन अंतर्गत ५९, हनुमाननगर झोन अंतर्गत ४१, धंतोली झोन अंतर्गत ८, नेहरुनगर झोन अंतर्गत १७, गांधीबाग झोन अंतर्गत ९, सतरंजीपूरा झोन अंतर्गत ९, लकडगंज झोन अंतर्गत ७, आशीनगर झोन अंतर्गत २२, मंगळवारी झोन अंतर्गत २० आणि मनपा मुख्यालयात ६ जणांविरुध्द ही कारवाई शोध पथकाचे प्रमुख विरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. ५०० रुपये प्रमाणे आतापर्यंत १५०६४ बेजबाबदार नागरिकांकडून रु ७५ लक्ष ३२ हजार वसूल करण्यात आले आहे.
आतापर्यंत लक्ष्मीनगर झोन अंतर्गत ३१८८ नागरिकांकडून रु.१४२७५००, धरमपेठ झोन अंतर्गत ४०८४ नागरिकांकडून रु १७०२७००, हनुमाननगर झोन अंतर्गत २२२२ नागरिकांकडून रु ९५८९००, धंतोली झोन अंतर्गत १५०० नागरिकांकडून रु ५६०७००, नेहरुनगर झोन अंतर्गत १०८१ नागरिकांकडून रु ४४४८००, गांधीबाग झोन अंतर्गत १३१६ नागरिकांकडून रु ५५६३००, सतरंजीपूरा झोन अंतर्गत १२८२ नागरिकांकडून रु ५४०५००, लकडगंज झोन अंतर्गत १०८२ नागरिकांकडून रु ४४४१००, आशीनगर झोन अंतर्गत २०३५ नागरिकांकडून रु ८३२१००, मंगळवारी झोन अंतर्गत २५०४ नागरिकांकडून रु.१०५०७०० आणि मनपा मुख्यालयात २४० नागरिकांकडून रु.१०७७०० जणांविरुध्द कारवाई करण्यात आली.
नागपूरात रुग्णांची संख्या सतत वाढत चालली आहे यावर नियंत्रण करण्यासाठी महानगरपालिकेचे उपद्रव शोध पथक दररोज दहा ही झोनमधील मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार नागरिकांविरुध्द कारवाई करत आहे. नागरिकांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, हात स्वच्छ धुणे इ. ची सूचना नागपूर मनपा व्दारे वारंवार केली जात आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता मास्क न वापणा-या नागारिकांना वचक बसावा व त्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यादृष्टीने ही दंडाची रक्कम १५ सप्टेंबर पासून ५०० रुपये करण्यात आली आहे. तरीसुध्दा नागरिक मास्क शिवाय फिरत आहेत.