
जिल्हा प्रतिनिधी/ सुनिल हिंगणकर
चिमूर :- चिमूर ते काम्पा जाणाऱ्या राज्यमार्गावर अगदी मालेवाडा या गावाजवळ असलेल्या डांबर प्लॅन्टचे वाल कंपाऊंड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर करण्यात आले असून शिवसेना तर्फे सार्वजनिक बांधकाम उप विभागीय अधिकारी यांना या अतिक्रमन बाबत या आधी सुद्धा निवेदन देण्यात आले होते. परंतु आता पर्यंत कोणतीही कार्यवाही डांबर प्लँट कंपनीवर करण्यात आलेली नाही.
या अधिकाऱ्यांवर कुणाचा दबाव तर येत नाही ना? अधिकारी हे दबावाखाली काम करीत असल्याची चर्चा रंगली असून नियम हे सर्वांसाठी लागु होत असतात मग तो श्रीमंत असो किंवा गरीब असो. सार्वजनिक बांधकाम विभाग व डांबर प्लॅन्टच्या मालकांचे संबध घनिष्ठ आहे असा सुद्धा अंदाज गावकऱ्यांमार्फ़त दर्शविला जात आहे.त्यामुळे या प्रकरणात सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत तर नाही ना?
परंतु या डांबर प्लॅन्टमुळे येणाऱ्या – जाणाऱ्या जनतेला त्रास होत आहे. जीव धोक्यात घालून वाहतुक सुरू आहे. राज्य मार्गाला लागुन तारेचे कंपाऊंड असल्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.या डांबर प्लँन्टला लागुनच उमा नदी चा मोठा नाला आहे. या नाल्याचे पाणी मलेवाडा , कारघाटा , सावरगाव ला पिण्यासाठी उपयोगात येत असुन प्लँन्ट मुळे व त्यातील धुळीमुळे व डस्ट मुळे पाणी खराब होत चालले आहे. यामुळे गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात येईल याची शक्यता नाकारता येत नाही.
त्या ठिकाणी रस्त्याला वळण असल्यामुळे येणाऱ्या – जानाऱ्या वाहानाला त्रास होत असते.डांबर प्लॅन्ट चे धुर येणाऱ्या – जानाऱ्या दुचाकी चालकांच्या डोळ्यात जात असल्याने नागरीकांना मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे.या प्लँन्ट मुळे नदी चा पाणी दूषित झाल्याने वन्यप्राणी व गावातील जनतेला धोका निर्माण झाला आहे. प्राण्यांची जिवितहाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.म्हणून या सर्व बाबी लक्षात घेऊन मौका चौकशी करण्यात यावी अशी मागणी चिमूर च्या जनतेकडून होत आहे.