Breaking News

नवेगाव नागझिरा आग दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या वन मजूरांच्या वारसाना ५ लाखांची मदत … जखमींच्या उपचाराचा खर्च ही शासन करणार- मुख्यमंत्री

 

नवेगाव नागझिरा आग दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या वन मजूरांच्या वारसाना ५ लाखांची मदत

जखमींच्या उपचाराचा खर्च ही शासन करणार- मुख्यमंत्री

मुंबई दिनांक ९:  नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात  नागझिरा आणि पिटेझरी या दोन वनपरिक्षेत्रात काल अज्ञात इसमाने लावलेली आग विझवतांना तीन हंगामी वनमजूरांचा मृत्यू झाला असून दोन वनमजूर जखमी झाले आहेत. मृत मजूरांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली असून आगीत जखमी वनमजूरांच्या उपचाराचा खर्च ही शासन करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

या दोन वन परिक्षेत्रात कक्ष क्रमांक ९७, ९८,९९,१०० येथे आग लागल्याची घटना दिसून आल्यानंतर जवळपास ५० ते ६० वनकर्मचारी, अधिकारी आणि हंगामी मजूर आग विझवण्याचे काम करत होते.  सायंकाळी ५ वाजता ही आग आटोक्यात आलीही परंतू वाऱ्याने पुन्हा अंगार पेटला आणि अचानक आगीने वेढल्याने व पहाडी जागा असल्याने वन वणवा विझवणाऱ्या तीन हंगामी वन मजूरांचा  मृत्यू झाला.

मृत्यू पावलेल्या वन मजूरांमध्ये राकेश युवराज मडावी (वय ४०), राहणार थाडेझरी, रेखचंद गोपीचंद राणे (वय ४५) राहणार धानोरी, सचिन अशोक श्रीरंगे (वय २७) राहणार कोसमतोंडी या हंगामी वनमजूरांचा समावेश आहे.

तर विजय तीजाब मरस्कोले (वय ४०) राहणार थाडेझरी, ता. सडक अर्जुनी, जि. गोंदिया, राजू शामराव सयाम (वय ३०) राहणार बोरुंदा, जिल्हा गोंदिया यांचा जखमींमध्ये समावेश आहे. त्यांना पुढील उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

अज्ञात इसमाने लावलेल्या आगीप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास चालू आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या बसचा समृद्धी महामार्गावर भिषण अपघात, २५ प्रवाशांचा मृत्यू

नागपूर / बुलढाणा :- समृद्धी महामार्गावरुन नागपूरहून पुण्याला जाणारी बसचा बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ …

राज्यपाल रमेश बैस यांचे नागपूर विमानतळावर स्वागत 

नागपूर दि.२३ : महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांचे नागपूर विमानतळावर शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता आगमन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved