नागपूर, दि. 26 : नागपूर जिल्हयातील जिल्हा परिषदेच्या 16 निवडणूक विभाग व पंचायत समितीतील 31 निर्वाचन गणाच्या पोट निवडणुका दिनांक 5 ऑक्टोंबर 2021 रोजी होणार आहेत. या निवडणुकीसंदर्भात सामान्य नागरिकांना कोणतीही तक्रार असल्यास त्यांनी या निरीक्षकांकडे आपल्या तक्रारी नोंदवाव्यात असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
पोट निवडणुकीकरिता विभागीय आयुक्त, नागपूर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मुन भंडारा (भ्रमणध्वनी 9763738855) यांची संपूर्ण निवडणूक प्रक्रियेकरिता निवडणूक निरिक्षक अधिकारी म्हणून नियुक्ती केलेली आहे.
तसेच पोट निवडणुकीसाठी असलेल्या नरखेड, काटोल, कळमेश्वर, सावनेर व पारशिवनी या तालुक्याकरीता निवडणूक निरिक्षक अधिकारी म्हणून प्रादेशिक चौकशी अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी, श्री. शैलेंद्र मेश्राम आयुक्त कार्यालय, नागपूर (भ्रमणध्वनी 9422835591) यांची नियुक्ती केलेली आहे.तसेच पोट निवडणुकी असलेल्या रामटेक, मौदा, उमरेड, कुही व भिवापूर या तालुक्याकरीता निवडणूक निरिक्षक अधिकारी म्हणून उपमहानिरिक्षक श्री. पराते मुद्रांक शुल्क नागपूर (भ्रमणध्वनी 9822472735) यांची नियुक्ती केलेली आहे.
तसेच पोट निवडणुकीसाठी असलेल्या कामठी, नागपूर (ग्रामीण), हिंगणा या तालुक्याकरीता निवडणूक निरिक्षक अधिकारी म्हणून उपायुक्त (रोहयो), तथा अपर जिल्हाधिकारी श्रीमती राजलक्ष्मी शहा नागपूर (भ्रमणध्वनी 9890452740) यांची नियुक्ती केलेली आहे.
निवडणुकीच्या संदर्भातील जिल्हयातील नागरिकांना काही तक्रारी असल्यास त्यांनी निवडणूक निरिक्षक अधिकारी यांच्यांशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हाधिकारी नागपूर यांनी केले आहे.