Breaking News

सोयाबीन शेताचे सर्वे करून शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्या- सावली येथील शेतकऱ्याची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी

वर्धा – सुरज गुळघाने

वर्धा:-वर्धा तालुक्यामध्ये सोयाबीन पिकावर आलेल्या रोगावर कृषी अधिकारी यांनी त्यांचे सर्व्हे मधून सदर पिकावर येलोमो जॅक (व्हायरस) रोगाने बऱ्याच शेतकऱ्याचे सोयाबीन पूर्णता शेंगा भरण्याआधीच पाणे पिवळे होऊन शेंगा कमी प्रमाणात लागून त्या शेंगांमध्ये कुठल्याही प्रकारचा दाणा नसून पूर्णता: उध्वस्त झालेचे निवेदन सावली गावातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले व तहसीलदार रमेश कोळपे यांना देण्यात आले.यावर्षीच्या हंगामात सोयाबीन व पराठीचे पिक फार जोमाने सुव्यवस्थेत वाढलेले होते यावर्षी सर्व शेतकरी उत्सवात होते की यावर्षी दिवाळी जोमाने साजरी होईल अशी आशा शेतकरी बांधवांनी उराशी बाळगून होती परंतु निसर्गानेआपला प्रकोप दाखवत सोयाबीन पिकावर पूर्णप्रताप दाखवून सोयाबीन हे पीक पूर्णता उध्वस्त केलेले आहे.

अशा वेळेस शेतकरी वर्ग पूर्ण विंवचेत असून काही शेतकऱ्यांनी आपल्या उभ्या पिकामध्ये गुरेढोरे सोडून सोयाबीन पीक उध्वस्त केलेले आहे याबाबतीत शासन स्थळी सरसकट सर्व्हे करुण शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाचा झालेले नुकसान शासनाने शेतकऱ्याला मदत म्हणून हेक्टरी 50 हजार रुपये देण्याचे त्वरित आश्वासन शासकीय दरबारी देण्यात यावे अशी अपेक्षा सर्वत्र शेतकऱ्यामार्फत व्यक्त होत आहे.त्याच प्रकारे तालुक्यातील शेतकरी लोकांनी शंभर टक्के पिक विमा काढलेला आहे पंतप्रधानांनी घोषणा केली की सर्व शेतकऱ्यांनी पिक विमा काढून या पिक विमा चा लाभ घ्यावा या हेतूने प्रधानमंत्री फसल पिक विमा योजना या नावाने सर्व शेतकऱ्यांनी काढलेला आहे जो पिक विमा काढला त्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याचे पूर्णतः सोयाबीन शेताचे सर्वे करून त्याचा नुकसानीचा भरणा त्वरित शेतकऱ्यांना देण्यात यावा.

फार मोठ्या गाजावाजाने सरकारने दर्शनीय भागावर करो अपनी फसल का बिमा फसल नष्ट होणे पर सरकार देंगे लाखो का मुआवजा काय हे घोषवाक्य कृतीमध्ये सरकार उतरवेल का? यावर पिक विमा धारकाचा प्रश्नचिन्ह उभा राहत सदर निवेदन देण्यासाठी माजी उपसरपंच भुषण झाडे यांच्या नेतृत्वात अरविंद बोरकर, सुरज गुळघाणे, प्रवीण चांभारे, महेश चांभारे, राहुल चांभारे, अमोल झाडे, महेश गुळघाणे, देवांशु गुळघाणे, सुधीर वाघमारे, निलेश गेडाम, जगदीश कलोडे, लक्ष्मण तिमांडे, राजू बोरकर, सचिन बोरकर, प्रफुल बुरीले, पवन गुळघाणे, तुषार कडू, गणेश डोळस्कर, संदीप श. बोरकर आदी कार्यकर्त्यांसह सर्व शेतकरी बांधवाच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

मतमोजणी प्रक्रियेत अतिशय गांभिर्याने काम करा – जिल्हाधिकारी विनय गौडा

नियोजन भवन येथे अधिकारी – कर्मचा-यांचा आढावा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : -निवडणूक प्रक्रियेमध्ये मतमोजणी …

F.D.R. मुदत संपून सहा महिने झाले तरी पैसे देत नाही म्हणून महिलेने दिला भर चौकात चोप

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव शहरातील डॉ. आंबेडकर चौका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved