Breaking News

ट्रॅक्टरच्या चाकाखाली दबून मजुराचा मृत्यू

जंगल परिसरातुन ट्रॅक्टर द्वारे रेतीची दैनंदिन चोरी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर :– गुरुवार 21 ला पहाटेच्या 4:00 वाजताच्या सुमारास खडसंगी जवळील नवेगाव (रामदेगी) येथील आकाश सोनटक्के वय 19 वर्षे असे तरुण मजूराचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार तरुणाचा रेतीची वाहतुक करीत असतांना ट्रॅक्टरच्या चाकाखाली दबून मृत्यू झाला.घटनास्थळ पिटीचुवा फॉरेस्ट FDCM जंगल खडसंगी या क्षेत्रातील आहे. आकाश सोनटक्के युवक व गावातील 6 मित्रां सोबत नेहमीच रांत्रीच्या सुमारास अवैध वाळू वाहतूक करण्याच्या कामावर मजूर होते प्रत्येक रांत्रोला सहा ते सात ट्रिप नेत असल्याने हि घटना पहाटेच्या सुमारात घडली मजूरांनी ट्रॅक्टर भरून गाडी खाली करण्यासाठी जात असल्याने काही अंतरावरच आकाश सोनटक्के युवक ट्रॅक्टर वरुन खाली पडल्याने चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने,

मागच्या चाकामध्ये दबल्याने ट्रॅक्टर चालक रोशन जाधव यांच्या मोठ मोठ्या आवाजाने बाकीच्या मजूरानी धाव घेतली असता युवकाचा जागीच मृत्यू झाला होता तालुक्यात मोठया प्रमाणावर भर दिवसा व रात्रोच्या वेळेसच जंगल परिसर प्रादेशिक , बफर , FDCM , या जंगलातून चोरटे मार्ग तयार करून रेतीची चोरी केली जात आहे. चिमूर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक सोरते साहेब, कुणाल राठोळ, सचिन खामनकर यांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. आपल्या आई, वडिलांना मृत तरुण हा एकटाच असल्याचे उपस्थित नागरिकांनी सांगितले. मृतकाचे शवविच्छेदन करण्यासाठी चिमूर उपजिल्हा रुग्णालय येथे नेण्यात आले, पुढील तपास चिमूर पोलीस करीत आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

मतमोजणी प्रक्रियेत अतिशय गांभिर्याने काम करा – जिल्हाधिकारी विनय गौडा

नियोजन भवन येथे अधिकारी – कर्मचा-यांचा आढावा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : -निवडणूक प्रक्रियेमध्ये मतमोजणी …

F.D.R. मुदत संपून सहा महिने झाले तरी पैसे देत नाही म्हणून महिलेने दिला भर चौकात चोप

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव शहरातील डॉ. आंबेडकर चौका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved