Breaking News

गाईला वाचवणाच्या नादात स्वतःचा जीव गमावला

रेल्वेच्या धडकेत एक शेतकरी आणि एक गाय जागीच ठार

तालुका प्रतिनिधी-सलीम शेख नागभीड

नागभीड:-नागभीड तालुक्यातील बोंड राजोली येथील शेतकरी व गाय आज दिनांक 10 एप्रिल2024 सकाळी 11.= 00 वाजताच्या दरम्यान गोंदिया – बल्लारशाह मेमू पॅसेंजर ला धडक लागून एक गाय आणि बोंड येथील दौलत हणाजी कुत्तरमारे वय (६५) वर्ष मरण पावला.
सविस्तर वृत्त असे आहे की,नेहमी प्रमाणे दौलत हणाजी कुत्तरमारे (६५) हा आपल्या घरच्या गायी सकाळीच रोजच चराई साठी नेत होता,आज पण नेला. चराई करून वापस घरी आणत असताना रेल्वे बोगद्याजवळ त्याची एक गाय रेल्वे रुळावर चढली, तेवढ्यात नागभीड मार्गाने चंद्रपूर कडे जाणारी रेल्वे त्याला येताना दिसली.

गायीला वाचवण्यासाठी हा रुळावर चढला पण त्याची चप्पल रेल्वे रुळावर फसल्याने तो तिथून सुटका करण्याच्या आधीच रेल्वेने धडक दिली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच काही अंतरावर समोर असलेली गाय सुध्दा धडकेत जागीच ठार झाली. घटनेची माहिती मिळताच नागभीड पोलीस घटनास्थळी दाखल होऊन शव विच्छेदन साठी ग्रामीण रूग्णालय मध्ये नेण्यात आले. पुढील तपास नागभीड पोलीस निरिक्षक विजय राठोड साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस एस आय सुरेश पानसे हे करीत आहेत.
दौलत हनाजी कुत्तरमारे यांच्या पश्चात दोन मुले,दोन मुली असा मोठा परिवार आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

शिष्यवृत्ती परिक्षेत वेदांती गभणे विद्यार्थिनीचे सुयश

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा)- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे द्वारा आयोजित प्राथमिक स्तरातुन फेब्रुवारी …

जिल्हाधिका-यांनी घेतला भ्रष्टाचार निर्मुलन समितीचा आढावा

तक्रारी असल्यास संबंधित विभाग किंवा समितीला कळविण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-भ्रष्टाचार निर्मुलनासंदर्भात जिल्हाधिकारी विनय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved