Breaking News

वन्यप्राण्यांच्या नुकसानीचे शेतकऱ्यांनी नुकसानभरपाईचा फायदा घ्यावा – विठ्ठलराव बदखल

रिवार्ड्स संस्था येथे एक दिवसीय शेतकरी यांचे प्रशिक्षण

तालुका प्रतिनिधी-सलीम शेख नागभीड

नागभीड:-समाज प्रगती सहयोग धारणी आणि रिवार्ड्स मल्टिपरपोज सोसायटी नागभीड यांच्या संयुक्त विद्यमाने अवॉर्ड कार्यालय नागभीड येथे शेतीपिकांचे वन्यप्राण्यामुळे होणाऱ्या नुकसानीवर उपाययोजना आणि नुकसान भरपाई विषयक एक दिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.या प्रशिक्षणाला मुख्य मार्गदर्शक म्हणुन विठ्ठलराव बदखल, संस्थापक, अध्यक्ष शेतकरी संरक्षण समिती चंद्रपूर, आणि गुणवंत वैद्य,रिवार्ड्स मल्टिपरपोज सोसायटी संस्थापक, अध्यक्ष नागभीड उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना विठ्ठलराव बदखल यांनी सांगीतले की, आजच्या युगात शेतीला खूप महत्त्व दिले जाते. पण वन्यप्राणीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहेत.

त्यावर शेतकऱ्यांनी नुकसान झाल्यावर अर्ज कसा करायचा? त्यासाठी शासन परिपत्रकात कोणत्या प्राणांच्या नुकसानीने किती रुपयांची नुकसान मिळते याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.तसेच पशुधन नुकसानी बाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच गुणवंत वैद्य यानी सांगीतले की, शेतकऱ्यांनी वन्यप्राण्यांच्या हैदोसमुळे झालेल्या नुकसान भरपाईचे ताबडतोब अर्ज वनविभागाला देऊन नुकसान भरपाईचे फायदे घ्यावे, आणि काही अडचण आल्यास आम्ही मार्गदर्शन केव्हा पण देण्यास तयार असणार असे वैद्य यांनी सांगितले.या कार्यक्रमाला ५० शेतकरी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन कैलास नन्नावरे तर आभार प्रदर्शन भोजराज नवघडे यांनी केले.प्रशिक्षण यशस्वीतेसाठी प्रफुल मसराम, सूनिता गाठे यांनी सहकार्य केले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

शिष्यवृत्ती परिक्षेत वेदांती गभणे विद्यार्थिनीचे सुयश

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा)- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे द्वारा आयोजित प्राथमिक स्तरातुन फेब्रुवारी …

जिल्हाधिका-यांनी घेतला भ्रष्टाचार निर्मुलन समितीचा आढावा

तक्रारी असल्यास संबंधित विभाग किंवा समितीला कळविण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-भ्रष्टाचार निर्मुलनासंदर्भात जिल्हाधिकारी विनय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved