जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर :- बल्लारपुर येथे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या बुध व बिएलओ व शाखा प्रमुखांची बैठक संत तुकाराम सभागृहात घेण्यात आली. यावेळी तालुक्यातील व शहरातील ९० बुध प्रमुख व ९० बिएलओ प्रमुखांची व गावातील व शहरातील प्रभाग प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.आगामी विधानसभा निवडणुकीच्यां अनुषंगाने शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे जिल्हाप्रमुख संदिपभाऊ गिऱ्हे यांनी बुध, बिएलओ व गावप्रमुख व प्रभागप्रमुखांच्या सर्वांना पक्षाचे ध्येय धोरणा विषयी मोलाचे मार्गदर्शन केले.
यावेळी उपजिल्हाप्रमुख सिककी भय्या यादव व महिला जिल्हा संघटीका कल्पनाताई गोरगाटे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तालुक्यातील प्रत्येक गावात व शहरातील वार्डात,प्रभागात शिवसेनेचा कार्य, माजी मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी केलेला कार्य ,पक्षाचा चिन्ह सर्वत्र पोहचवा व समस्या विरुध्द आवाज उठवा शिवसेनेचा ब्रीद वाक्य ८०% समाजकारण व २०% राजकारण या प्रमाणे करा असे बैठकीत शिवसेना जिल्हाप्रमुख संदिपभाऊ गिऱ्हे यांनी आवाहन केले.यावेळी तालुका प्रमुख बब्बू पाठक, शहरप्रमुख बाबा साहू,नगरसेवक सरफराज शेख,नगरसेवक सागर राऊत,तालुका महिला संघटिका मीनाक्षीताई गलगट,शहर संघटिका ज्योतीताई गेहलोत, प्रशांत मेश्राम तालुक्यातील पक्षाचे सरपंच,उपसरपंच,सदस्य व शहरातील मा.नगरसेवक,पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.