Breaking News

‘त्या’ घटनेच्या निषेधार्थ दलित संघटनांचा रास्ता रोको

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व सर्व दलित समाजाबद्दल आक्षेपार्ह भाषा असणारी काही पत्रके नाशिकमध्ये पसरवून जातीवाद निर्माण केल्याच्या निषेधार्थ शेवगांवच्या क्रांती चौकात रास्ता रोको

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगाव

शेवगाव :- मंगळवार दि.२५ रोजी शेवगाव शहरातील क्रांती चौकामध्ये शेवगाव शहरातील विविध सर्वपक्षीय दलित संघटनांनी सुमारे एक तास रास्ता रोको आंदोलन केले.या वेळी आंदोलनकर्त्यांनी नाशिकच्या या घटनेचा निषेध व्यक्त करत माथेफिरू प्रथमेश चव्हाण व त्याला मदत करणाऱ्या व्यक्तीवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी केली तसेच आंदोलन करताना सरकारच्या विरोधात मोठी घोषणाबाजी करण्यात आली. तासभर चालू असलेल्या या रास्ता रोको आंदोलनामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. या वेळी अनेक सर्वपक्षीय कार्यकत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या वेळी पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.

या वेळी आंदोलन कर्त्यांनी सदर घटनेच्या निषेधाचे निवेदन पोलिसांना दिले. या वेळी रिपब्लिकन नेते पवनकुमार साळवे, कॉ. सुभाष पाटील लांडे, ताहेर भाई पटेल, प्रा. किसन चव्हाण, सुनील सेठ आहुजा राजू मगर, कॉ. संजय नांगरे, अॅड. अविनाश मगरे, राहुल सावंत, सतीश मगर, प्रवीण भारस्कर, सतीश पाटील लांडे, एजाजभाई काझी, आप्पा मगर, गोरख वाघमारे, गणेश हनवते, अशोक शिंदे, प्यारेलाल शेख, संजय गंगावणे, अनिल इंगळे, जकिरभाई कुरेशी, कैलास तिजोरे, आज्जू भाई कुरेशी, अजय मगर, विकी मगर, कुणाल इंगळे, कडू मगर, सचिन इंगळे, अरुण मगर, प्रशांत मगर, राहुल पगारे, राहुल पवार, प्रताप साळुंखे, निरंजन बोरुडे, शिवा मगर, प्रदीप मोहिते,रॉबिन मगर, अविनाश साळुंके, राजू मोहिते, राहुल वरे अविनाश तुजारे, क्रांती मगर, छबू मंडलिक, विश्वास हिवाळे, रत्नाकर मगर, राजू वाघमारे, भारतीय बौद्ध महासभेचे संतोष पटवेकर, बाळासाहेब धस, दत्तात्रय निकाळजे, सतीश ठोंबे, सचिन दळवी यांचेसह अनेक सर्वपक्षीय दलित कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

*ताजा कलम*

*शेवगाव पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर नाशिकचे विभागीय पोलिस आयुक्त यांच्या आदेशानुसार जिल्ह्यामध्ये नाशिक शिक्षक मतदारसंघाचे इलेक्शन असल्याने जमावबंदी आणि 144 कलम लागू असताना सुद्धा आंदोलन केल्यामुळे आंदोलकांवर गुन्हे दाखल केल्याची माहिती कळते सरकारने पोलीस प्रशासनाला हाताशी धरून जाणीवपूर्वक आंदोलकांवर गुन्हे दाखल केल्याची भावना दलित कार्यकर्त्यांमध्ये आहे* सरकारचा आंदोलन दडपण्याचा हा केविलवाणा प्रकार असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे

*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

नवनियुक्त जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांनी स्वीकारला कार्यभार

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा )- नवनियुक्त जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांनी आपल्या पदाचा कार्यभार …

मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वाखाली वरोरा-भद्रावती विधानसभेत प्रचाराला वेग

एक हजार टी-शर्टचे वितरण, निवडणुकीसाठी भक्कम तयारी सुरू जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर भद्रावती :-  शिवसेना (उद्धव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved