सामाजिक कार्यकर्ते रोशन फुले यांची मागणी
जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण
मो.9665175674
भंडारा :- निसर्गाच्या प्रकोपाने लाखनी, साकोली, लाखांदूर या तिन्ही तालुक्यात सतत पाच दिवसापासून अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कटित झालेले आहे.कित्येक गावातील घरांमध्ये पुराचे पाणी शिरले तर हजारो हेक्टर शेती पाण्याखाली आल्याने सर्व सामान्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामूळे शासन प्रशासनाने लाखनी,लाखांदूर व साकोली ह्या तीन तालुक्यांमध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून सरसकट मदत द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता रोशन फुले यांनी केली आहे.
भंडारा जिल्ह्यात दि. १९ जुलै २०२४ पासून सतत पाच दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे. तिन्ही तालुक्यांमध्ये नदी नाले मोठ्या प्रमाणात असून काही नाल्यांना लवकर पूर येतो तर गोसेखुर्डच्या डाव्या कालव्यामुळे काही गावांना कृत्रिम पूराचा फटका बसत आहे. या अतिवृष्टीमुळे नदी-नाल्याना पुर आल्यामुळे या पुराचे पाणी गावा गावात आणि अनेकच्या घरात शिरून मोठ्या प्रमाणात घराची पळझड झाली. तर मागील पाच दिवसापासून पुराचे पाणी शेतात साचल्याने धानपीक, सोयाबीन, तूर, माळवा,भाजीपालाआदी पिके सडली. यात शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शासन प्रशासनाने याची दखल घेवून लाखनी, लाखांदूर व साकोली तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे धान, सोयाबीन, तूर,भाजीपाला पिकांचे सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी.तसेच सततच्या पावसामुळे ज्या घराची, जनावरांच्या गोठ्यांची पळझड झाली आहे. त्यांची तालुकानिहाय यादी तयार करून त्यांना तात्काळ आर्थिक मदत करावी, तसेच त्यांना शासनाने अतिशिग्र घरकुल योजनेचा लाभ द्यावा अशी मागणी रोशन फुले सामाजिक कार्यकर्ते यांनी केली आहे.